अनाथ लहान मूल दत्तक घेणाऱ्या महावितरणच्या महिला कर्मचाऱ्यांना ‘विशेष रजा’

 
Advertisement
Advertisement
Advertisement
 
Advertisement

अनाथ लहान मूल दत्तक घेणाऱ्या म.रा.वि.वितरण कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना ‘विशेष रजा’ (Special Leave) मंजूर करणेबाबत.

1. महाराष्ट्र शासन निर्णय क्र.अर-१४९०/१२/सेवा-९, दिनांक ८.०७.१९९५ अन्वये लहान मूल दत्तक घेणाऱ्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांना १ (एक) वर्षाची रजा मंजूर करण्याबाबत तरतूद करण्यात

Advertisement
आलेली होती.

त्यानुसार मंडळ ठराव क्र.९६० दि.१९.१२.१९९७ अन्वये अंतर्गत बदलाची सूचना (Notice of Change) देऊन सदरील तरतुदीची अंमलबजावणी करावी असा निर्णय घेण्यात आलेला होता.

या निवाडा क्र. २९/२००० चा निकाल औद्योगिक न्यायाधिकरण,मुंबई यांनी आदेश/ अधिसूचना क्र.औसं/प्रसिध्दी/निवाडा/ प्र-५/२००७/कार्यासन-७ दिनांक ४ जानेवारी ००८ नुसार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मुंबई यांच्या बाजूने दिलेला आहे.

शिवाय महाराष्ट्र शासन निर्णय क्र. अरजा-२४९५/२६/सेवा-९, मंत्रालय, मुंबई, दिनांक २६ ऑक्टोबर १९९८ अन्वये अनाथ लहान मूल दत्तक घेणाऱ्या राज्य शासकीय महिला कर्मचाऱ्यांना शासनाने ‘विशेष रजा’ (Special Leave) मंजूर केली.

या अनुषंगाने अनाथ लहान मूल दत्तक घेणाऱ्या म.रा.वि.वितरण कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना ‘विशेष रजा’ (Special Leave) मंजूर करण्याबाबतचा प्रस्ताव कंपनीच्या विचाराधीन होता.

2. या संदर्भात शासनाने केलेल्या तरतुदीचा सर्वकष विचार करुन व्यवस्थापकीय संचालक (महावितरण) यांनी संचालक (वित्त), संचालक (संचलन) व संचालक (मासं) यांच्याशी विचारविनिमय करुन अनाथ मूल दत्तक घेणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना ‘विशेष रजा’ (Special Leave) मंजुरीचा निर्णय घेतलेला आहे. ही विशेष रजा खालील शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यात येईल. . 

  1. कायम सेवेतील किंवा दोन वर्ष सतत सेवा झाली आहे अशा महिला कर्मचाऱ्यांनाच ही ‘विशेष रजा’ (Special Leave) अनुज्ञेय राहील.
  2. शासनमान्य अनाथालय/संस्था यामधून तीन वर्षापेक्षा कमी वयाचे आणि अनाथ असलेले मूल दत्तक घेतलेले असावे.
  3. मूल दत्तक घेण्यासंबंधातील कायदेशीर कागदपत्रे सादर करणे आवश्यक राहील.
  4. ‘विशेष रजा’ (Special Leave) ९० दिवसांपर्यंत अनुज्ञेय राहील आणि मूल दत्तक घेण्याच्या दिनांकापासून  ९० दिवस किंवा मुलाचे वय तीन वर्ष पूर्ण होईल तो दिनांक यापैकी जो अगोदरचा दिनांक येईल त्या दिनांकापर्यंतच्या कालावधीसाठी अनुज्ञेय राहील.
  5. संपूर्ण सेवेच्या कालावधीत ही रजा एकदाच अनुज्ञेय राहील.
  6. फक्त स्वतःचे मूल नसलेल्या महिला कर्मचाऱ्यांनाच ही रजा अनुज्ञेय राहील.

सदर ‘विशेष रजेची’ सवलत ही महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कर्मचारी सेवाविनिमय क्र.५३ (ई) म्हणून समाविष्ट करण्यात येईल. 

सदर परिपत्रक www.mahadiscom.in या कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले 

Download प्रशासकीय परिपत्रक क्र . 172 दिनांक 16/09/2008

कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी 

Clip On Meter | Tong Tester

 

Advertisement
whatsapp-group-artechgallery.in
Advertisement
आम्हाला खात्री आहे की हा लेख आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. AR Tech Gallery मध्ये आम्ही महावितरणशी संबंधित नवीन जुने परिपत्रक (Circulars) ह्याबद्दल माहिती, नवीन Updats MD India Medicine Policy बद्दल माहिती नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती,इत्यादी माहिती पोस्ट करत असतो. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला त्यासाठी आपण खाली "प्रतिक्रिया द्या" ह्या मध्ये सांगू शकता. आणि आपल्याला विनंती आहे की आमचा Facebook ग्रुप मध्ये सहभागी व्हा. खलील लिंक वर क्लिक केल्यास आपण AR Tech च्या Facebook Group मध्ये जॉईन होण्यासाठी Request करुस शकता. https://www.facebook.com/groups/artechgallery.in/?ref=share
Advertisement
Advertisement
आम्हाला खात्री आहे की हा लेख आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. AR Tech Gallery मध्ये आम्ही महावितरणशी संबंधित नवीन जुने परिपत्रक (Circulars) ह्याबद्दल माहिती, नवीन Updats MD India Medicine Policy बद्दल माहिती नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती,इत्यादी माहिती पोस्ट करत असतो. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला त्यासाठी आपण खाली "प्रतिक्रिया द्या" ह्या मध्ये सांगू शकता. आणि आपल्याला विनंती आहे की आमचा Facebook ग्रुप मध्ये सहभागी व्हा. खलील लिंक वर क्लिक केल्यास आपण AR Tech च्या Facebook Group मध्ये जॉईन होण्यासाठी Request करुस शकता. https://www.facebook.com/groups/artechgallery.in/?ref=share
whatsapp-group-artechgallery.in

प्रतिक्रिया द्या

error

Share करा

%d bloggers like this: