अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (CMD) साहेब, महावितरण, यांचा महावितरण अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी Coronavirus (COVID-19) संदर्भात अत्यंत महत्वाचा संदेश.

 

अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (CMD) साहेब, महावितरण, यांचा महावितरण अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी Coronavirus (COVID-19) संदर्भात अत्यंत महत्वाचा संदेश.

वीज पुरवठा ही अत्यावश्यक सेवा आहे. महावितरणमधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वीज पुरवठा सुरळीत व अखंडितपणे सुरु ठेवण्यासाठी मोलाचे योगदान केले आहे.

या प्रशंसनीय कामगिरीबद्दल मा. मंत्री , उर्जा यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले आहे तसेच सर्वांचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहेत.

याच अनुषंगाने असाही निर्णय घेण्यात आला आहे की, Coronavirus (COVID-19) या कठीण परिस्थितीमध्ये अतिउत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांस योग्य बक्षीस देऊन गौरविण्यात येईल.

केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशान्वये Coronavirus (COVID-19) विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तथापि, वीज पुरवठा ही अत्यावश्यक सेवा असल्याने ग्राहकाना सुरळीत वीज पुरवठा देण्याच्या दृष्टीने खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

निर्गमित केलेल्या सूचना

 1.  सर्व वेतनगट ३ व ४ मधील तांत्रिक | अतांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यांना व कंत्राटी कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझर खरेदीकरिता प्रत्येकी रु. १,०००/- अग्रीम अदा करण्यात येईल. सदर रक्कम माहे एप्रिल-२०२० च्या वेतनामध्ये किंवा तत्पूर्वी अदा करण्यात येईल.
 2. ग्राहकाशी थेट संपर्क होऊ नये याकरिता मिटर रिडींग, वीज बिल वितरीत करणे, वीज बिल भरणा केंद्र, वीज चोरी मोहिम, वीज पुरवठा खंडित करणे इत्यादी प्रक्रिया थांबविण्यात आलेल्या आहेत. तसेच अत्यंत तातडी असल्याशिवाय दि.१४.०४.२०२० पर्यंत “Planned Outage” करण्यात येऊ नये.
 3. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या मुख्यालयातच राहावे व आवश्यकतेनुसार दूरध्वनीद्वारे संपर्कात राहून अत्यावश्यक सेवेकरीता कर्मचाऱ्यांशी समन्वय साधावा. सर्व कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना ओळखपत्र सोबत बाळगावे व गणवेश परीधान करावा.
 4. सदर कर्मचारी अत्यावश्यक सेवेत असल्याबाबतचे पत्र संबंधित नियंत्रण अधिकाऱ्यांमार्फत देण्याची व्यवस्था तात्काळ करण्यात यावी. जेणेकरून संचारबंदीच्या काळात कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेसाठी जाण्याकरिता अडथळा निर्माण होणार नाही. अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत.
 5. सर्व तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील कर्मचाऱ्यानी त्यांच्या कार्यक्षेत्रात राहाणे अनिवार्य आहे. शाखा कार्यालय तसेच उपविभागीय कार्यालयातंर्गत कार्यरत अभियंत्यांच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी विभागीय, मंडळ, परिमंडळ कार्यालयातील अभियंत्यांची रिलिव्हर म्हणून नेमणूक करण्यात येईल. तसेच सदर अभियंत्यांना साप्ताहिक ऑन कॉल डयुटीकरिता नियुक्त करण्यात येईल, जेणेकरून तातडीच्या प्रसंगी अभियंते उपलब्ध राहतील. तसेच वीज पुरवठ्याशी निगडित जे अभियंते व कर्मचारी कार्यक्षेत्र अंतर्गत मुख्यालयात उपलब्ध राहणार नाहीत त्यांचेवर संबधित अधिक्षक अभियंता व मुख्य अभियंता शिस्तभंग कारवाई करतील.
 6. सदर कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार कामावर जाणे येणे करण्यासाठी कंपनीचे वाहन उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितांनी दक्षता घ्यावी.
 7. सदर कर्मचाऱ्यांच्या दुचाकी वाहनावर “अत्यावश्यक सेवा, महाराष्ट्र शासन उपक्रम महावितरण” असे पत्रक लावण्यात यावे.
 8. बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचे वेतन ७ तारखेपूर्वी करण्याबाबत संबंधित कंत्राटदारास सुचना दयाव्यात तसेच उपरोक्त कालावधीत अनुपस्थितीसाठी त्यांचे वेतन कपात करण्यात येणार नाही.
 9. सर्व यंत्रचालकानी उपकेंद्रातील त्यांच्या कामाच्या वेळा परस्पर समजूतीने ठरविण्यात याव्यात व तशी माहिती नियंत्रण अधिकाऱ्यांस देण्यात यावी. तसेच प्रत्येक तासाला फिडर रिडींग न घेता फक्त दिवसातून दोन वेळेस फिडर रिडींग घेण्यात यावे. जेणेकरून उपकरणाना वारंवार हाताळावे लागणार नाही.
 10. सर्व लाईन स्टाफ यांनी त्यांना नेमून दिलेल्या वेळेनुसार कामकाज करावे.
 11. जे कर्मचारी बाहेर गावावरून कामाला येणे जाणे करतात त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था कंपनीच्या विश्रामगृहामध्ये किंवा कार्यालया मध्ये करण्याबाबत संबंधितांनी दक्षता घ्यावी.
 12. कर्मचाऱ्यांस ग्राहकांकडून मारहाण झाल्यास संबंधित कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता,मुख्य अभियंता यांनी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचेशी संपर्क करावा व कर्मचाऱ्यांला संपूर्ण सहकार्य करण्यात यावे.

 13. बायोमेट्रिक हजेरी पद्धती स्थगित करण्यात येत आहे. तसेच प्रशासकीय कार्यालयामध्ये आवश्यकतेनुसार फक्त ५% पर्यंत उपस्थिती राहील याची दक्षता घ्यावी. येत आहे. तसेच प्रशासकीय

 14. सर्व प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम पुढील सुचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे.
 15. सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन विहीत वेळेत करण्यात येईल. तसेच माहे मार्च-२०२० मध्ये सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपदानाची रक्कम त्वरित अदा करण्यात येईल. तथापि, रजा रोखीकरण व इतर देयके नंतर अदा करण्यात येईल.
 16. सर्व संबंधितानी इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमाचा उपयोग करावा जसे व्हीडिओ कॉन्फरेन्स, ऑडिओ कॉल, व्हाट्स अँप, ट्विटर, फेसबुक, ई-मेल इत्यादीचा वापर दैनंदिन कामकाजात करावा.
 17. स्थापत्य विभागामार्फत अत्यंत महत्वाच्या कामाव्यतिरिक्त कोणतेही काम करण्यात येऊ नये.
 18. सुरक्षा रक्षक व सफाई कामगार यांना देखील हॅन्ड सॅनिटायझर व मास्क उपलब्ध करून देण्यात यावे.
 19. सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्ये प्रवेशद्वार, अभ्यागत कक्ष, लिफ्ट, वसाहत इत्यादी ठिकाणी सामाजिक अंतर (Social Distancing) ठेवण्याबाबतच्या स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत.
 20. कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदली १४ एप्रिल २०२० अथवा पुढील सूचनेपर्यंत स्थगित करण्यात येत आहे.

 21. सर्व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी महावितरण अँपद्वारे सूचना देण्यात येईल.

सबब, सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना निर्देशीत करण्यात येते की Lockdown परिस्थिती नियंत्रणात येई पर्यंत वरील सूचनाचे तात्काळ प्रभावाने काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक (CMD) साहेब, महावितरण, यांचा महावितरण अधिकारी व कर्मचार्‍यांसाठी Coronavirus (COVID-19) संदर्भात अत्यंत महत्वाचा संदेश.अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक

महावितरण

सदर पत्र हे Employee Portal वर उपलब्ध आहे

आम्हाला खात्री आहे की हा लेख आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. AR Tech Gallery मध्ये आम्ही महावितरणशी संबंधित नवीन जुने परिपत्रक (Circulars) ह्याबद्दल माहिती, नवीन Updats MD India Medicine Policy बद्दल माहिती नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती,इत्यादी माहिती पोस्ट करत असतो. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला त्यासाठी आपण खाली "प्रतिक्रिया द्या" ह्या मध्ये सांगू शकता. आणि आपल्याला विनंती आहे की आमचा Facebook ग्रुप मध्ये सहभागी व्हा. खलील लिंक वर क्लिक केल्यास आपण AR Tech च्या Facebook Group मध्ये जॉईन होण्यासाठी Request करुस शकता. https://www.facebook.com/groups/artechgallery.in/?ref=share

प्रतिक्रिया द्या

error

Share करा

%d bloggers like this: