Dialysis या उपचारावारील खर्चाची प्रतिपूर्ति | Kidney Transplant Surgery पूर्वी-पश्चात

 

महाराष्ट्र राज्य विद्यूत वितरण कंपनीतील अधिकारी/कर्मचारी यांना मुत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रियेपूर्वी (Kidney Transplant Surgery) व शस्त्रक्रियेनंतर करण्यात येणाऱ्या “डायलिसीस” (Dialysis) या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती मिळणेबाबत.


Dialysis ह्या पचारच्या खरचसाठी महावितरण कर्मचाऱ्यांना Kidney Transplant Surgery पूर्वी व पश्चात किती  प्रतिपूर्ति मिळते? त्यासाठी प्रशासकीय  परिपत्रक क्रमांक 189 दिनांक17/11/2008 हे प्रशासनाने प्रकाशित केलेले आहे. त्या बद्दल आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

Mahavitaran

1.महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मधील कर्मचाऱ्यांना सा.आ.क्र.२० (क), दिनांक १७/०६/९६३ (वेळोवेळी सुधारित केलेल्या) मध्ये समाविष्ट केलेल्या गंभीर आजारांवर उपचार शस्त्रक्रिया करून घेतल्यास त्याप्रित्यर्थ होणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती देण्यात येते.

महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांना मूत्रपिंड प्रतिरोपण शस्त्रक्रियेपूर्वी (Kidney Transplant Surgery) व शस्त्रक्रियेनंतर करण्यात येणाऱ्या ‘डायलिसीस’ (Dialysis) या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेय करण्याबाबतचा प्रस्ताव कंपनीच्या विचाराधीन होता. 

2..या संदर्भात आता व्यवस्थापकीय संचालक यांनी संचालक (वित्त) व संचालक (संचलन) यांच्याशी विचारविनिमय करून Kidney Transplant Surgery पूर्वी व शस्त्रक्रियेनंतर करण्यात येणाऱ्या ‘डायलिसीस’ (Dialysis) या उपचारावरील खर्चाची प्रतिपूर्ती अनुज्ञेय करण्याबाबत मंजुरी प्रदान केली आहे. 

3. Kidney Transplant Surgery व शस्त्रक्रियेनंतर करण्यात येणाऱ्या ‘डायलिसीस’ (Dialysis) उपचारावरील खर्च प्रतिपूर्ती मर्यादा ही Jaslok Hospital, Numbai येथे आकारण्यात येणाऱ्या रकमेच्या मर्यादेपर्यंत किंवा प्रत्यक्षात झालेला खर्च यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढ्या रकमेची प्रतिपूर्ती अनुज्ञेय राहील. 

4. अशा ‘डायलिसीस’ (Dialysis) खर्च प्रतिपूर्तीची काही प्रलंबित प्रकरणे असल्यास ती या तरतुदीनुसार निकाली काढावी. 

5. सदर प्रशासकीय परिपत्रक www.mahadiscom.in या कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात  आले आहे. 

Download प्रशासकीय परिपत्रक 189 दिनांक 17/11/2008

MD India Mediclaim Policy For MSEB HCL Group 2020-21-Full Info In Marathi

MD India E Card Download For MSEB Employees (2020-21)- In Marathiआम्हाला खात्री आहे की हा लेख आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. AR Tech Gallery मध्ये आम्ही महावितरणशी संबंधित नवीन जुने परिपत्रक (Circulars) ह्याबद्दल माहिती, नवीन Updats MD India Medicine Policy बद्दल माहिती नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती,इत्यादी माहिती पोस्ट करत असतो. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला त्यासाठी आपण खाली "प्रतिक्रिया द्या" ह्या मध्ये सांगू शकता. आणि आपल्याला विनंती आहे की आमचा Facebook ग्रुप मध्ये सहभागी व्हा. खलील लिंक वर क्लिक केल्यास आपण AR Tech च्या Facebook Group मध्ये जॉईन होण्यासाठी Request करुस शकता. https://www.facebook.com/groups/artechgallery.in/?ref=share

प्रतिक्रिया द्या

error

Share करा

%d bloggers like this: