Raincoat | Rain Suit | Gum Boot महावितरण कर्मचाऱ्यांना पुरविणे / प्रतिपूर्ति परिपत्रके

महावितरण मधील कर्मचाऱ्यांसाठी पूर्वीपासून Raincoat व Rain Suit कंपनीकडून पुरविले जात होते. आणि आता Rain Suit खरेदीच्या किमतीसाठी साठी  काही ठराविक रक्कम (प्रतिपूर्ति म्हणून) कर्मचाऱ्यांना दिली जाते. बऱ्याच कर्मचाऱ्यांना हयाबद्दल माहीत नसेल.

वेळोवेळी महावितरण प्रशासनाने काही परिपत्रके काढून हयाबद्दल स्पष्ट केले आहे. त्याच काही परिपत्रकांबद्दल ह्या आर्टिकल मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर मित्रांनो आर्टिकल पूर्ण वाचा. आणि आपण सुद्धा ह्याचा फायदा घेऊ शकता.

तारमार्गावर काम करणारे कर्मचारी (Line Staff) ह्यांना Raincoat ऐवजी Rain Suit पुरविणेबाबत

प्रशासकीय परिपत्रक क्रमांक 15 दिनांक 09/01/2006 

1.संहिताबध्द सर्वसाधारण आदेश क्र.१ दि.३१.१०.१९७२ अनुसार पूर्वीच्या म.रा.वि. मंडळातील संचालन व सुव्यवस्था मंडलांमध्ये तारमार्गावर काम करणा-या कर्मचा-यांना (Line Staff) ‘रेनकोट’ (Raincoat) पुरविला जात होता.

संबंधित कर्मचा-यांना पावसाळयामध्ये काम करताना वापरण्यात सुलभता तसेच सुरक्षितता असावी या दृष्टीने म.रा.वि.मंडळाच्या पुनर्रचनेनंतरच्या म.रा.वी.वितरण कंपनीतील संचालन व सुव्यवस्था मंडलांमध्ये तारमार्गावर काम करणा-या कर्मचा-यांसाठी ‘रेनकोट’ (Raincoat) ऐवजी ‘रेनसूट’ (Rain Suit) (Rain Suit) द्यावा असे वितरण कंपनीच्या काही कार्यालयांकडून प्रस्तावित करण्यात आले होते.

2. या संदर्भात सर्वकष विचार करून मुख्य महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) आणि कंपनी संचालक (वित्त) यांच्या सहमतीने व्यवस्थापकीय संचालक यांनी प्रशासकीय परिपत्रक क्र.१ दि.२९.९.२००५ अन्वये दिलेल्या अधिकारानुसार म.रा.वी.वितरण कंपनीतील संचालन व सुव्यवस्था मंडलांमध्ये तारमार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना (Line Staff) ‘रेनकोट ऐवजी रेनसूट’ पुरविण्यासाठी मंजुरी दिली आहे.

3. सदर रेनसूटची किंमत कमाल रु.५५०/- (रुपये पाचशे पन्नास पर्यंत फक्त) पर्यंतच असावी. (वर्ष 2017 पर्यन्त)  

4. ‘रेनसूट’ (Rain Suit) २ वर्षाच्या प्रत्येक गटवर्षाकरिता द्यावयाचा असून चालू गटवर्थ २००५-२००७  असे धरले जावे.

_________________________________________________________________________________________

‘रेनकोट’ (Raincoat) साठी पात्र कर्मचाऱ्यांना ‘रेनसूट’ (Rain Suit) पुरविणेबाबत. 

प्रशासकीय परिपत्रक क्र. 62 दिनांक ५/७/२००६

1.संहिताबद सर्वसाधारण आदेश क्र.१ दि.३१.१०.१९७२ अनुसार पूर्वीच्या म.रा.वि.मंडळातील ठराविक कर्मचाऱ्यांना रेनकोट’ पुरविला जात होता. पावसाळयामध्ये काम करताना वापरण्यात सुलभता व सुरक्षितता असावी या दृष्टीने म.रा.वि.मंडळाच्या पुनर्रचनेनंतरच्या महावितरण कंपनीतील संचालन व सुव्यवस्था मंडलांमध्ये फक्त तारमार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ‘रेनकोट’ (Raincoat) ऐवजी ‘रेनसूट’ (Rain Suit) द्यावा अशा सूचना प्रशासकीय परिपत्रक क्र.१५ दि.१.१.२००६ अन्वये प्रसृत करण्यात आल्या आहेत.

2. तथापि, संहिताबध्द सर्वसाधारण आदेश क्र.१ दि.३१.१०.१९७२ अनुसार जे कर्मचारी पूर्वीच्या म.रा.वि.मंडळाकडून ‘रेनकोट’ (Raincoat) साठी पात्र आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना महावितरण कंपनीकडून ‘रेनकोट’ (Raincoat) ऐवजी ‘रेनसूट’ (Rain Suit) पुरविण्यात यावा अशी मागणी विविध संघटनांच्या वतीने करण्यात आली होती.

3. या संदर्भात सर्वकष विचार करुन संचालक (संचलन) आणि संचालक (वित्त) यांच्याशी विचारविनिमय करून व्यवस्थापकीय संचालक यांनी, म.रा.वि.वितरण कंपनीतील जे कर्मचारी संहिताबध्द आदेश क्र.१ दि.३१.१०.१९७२ अनुसार ‘रेनकोट’ (Raincoat) पुरविण्यासाठी पात्र आहेत अशा सर्व कर्मचाऱ्यांना रेनकोट’ ऐवजी ‘रेनसूट’ (Rain Suit) पुरविण्यासाठी मंजुरी दिली आहे.

4. यानुसार संदर्भिय परिपत्रक क्र. १७२० दि.१०.६.१९९९ मध्ये प्रसृत केलेल्या सूचनांच्या धर्तीवर महावितरण कंपनीकडून रेनकोट’ मिळण्यास पात्र असणारे कर्मचारी रेनसूट’ची खरेदी करुन त्याची प्रतिपूर्ती मिळण्यास पात्र रहातील.. .

5. सदर रेनसूट‘ ची किंमत कमाल रु.५५/- (रुपये पाचशे पन्नास फक्त) पर्यंतच असावी. (वर्ष 2017 पर्यन्त)

6. परिपत्रक क्र.साप्रवि/सामान्य/१७२०,दिनांक १०.६.१९९९ मध्ये प्रसृत करण्यात आलेल्या इतर सूचना अबाधित रहातील.

7.रेनसूट’ २ वर्षाच्या प्रत्येक गटवर्षाकरिता द्यावयाचा असून चालू गटवर्ष २००६-२००८ असे धरले जावे.

_________________________________________________________________________________________

सर्व उपकेंद्रामध्ये कार्यरत असणाऱ्या यंत्रचालकांना ‘रेनसूट’ (Rain Suit) व ‘गमबूट’ (Gum Boot) पुरविणेबाबत.

प्रशासकीय परिपत्रक क्र. १२९ दिनांक ०२ / ११ / २००७

1. संहिताबध्द सर्वसाधारण आदेश क्र.दि.३१..१९७अनुसार पूर्वीच्या म.रा.वि.मंडळातील ठराविकर्मचाऱ्यांना ‘रेनकोट’ (Raincoat) ‘गमबूट’ (Gum Boot) पुरविले जात होते.

तसेच प्रशासकीय परिपत्रक क्र.६२ दिनांक ०५.०७.२००६ न्वये कंपनीतील सर्व रेनकोटमिळण्यास पात्र कर्मचाऱ्यांना रेनसूटखरेदी करुन त्याची प्रतिपूर्ती मिळण्यास पात्र ठरविण्यात आलेले आहे.

2.. पावसाळयामध्ये काम करतांना सुलभता सुरक्षितता असावी या दृष्टीने .रा.वि.वि.कंपनीतील उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या यंत्रचालकांना रेनसूट’ ‘गमबूट’ (Gum Boot) पुरविण्याबाबतचा प्रस्ताव कंपनीच्या विचाराधीन होता.

3.. या संदर्भात सर्वंकष विचार करुन व्यवस्थापकीय संचालक यांनी संचालक (संचलन) आणि संचालक (वित्त) यांच्याशी विचारविनियम करुन महावितरण कंपनीतील उपकेंद्रामध्ये काम करणाऱ्या यंत्रचालकांना रेनसूट’ व ‘गमबूट’ (Gum Boot) खरेदीच्या प्रतिपूर्तीस मंजूरी दिली आहे.

4.. यानुसार महावितरण कंपनीतील उपकेंद्रांत कार्यरत असलेले कनिष्ठ यंत्रचालक, सहाय्यक यंत्रचालक यंत्रचालक हे ‘रेनसूट’ (Rain Suit) ‘गमबूट’ (Gum Boot) करिता निम्ननिर्देशित दराने कमाल अथवा प्रत्यक्ष खर्चाची रक्कम यातील किमान खर्चाची प्रतिपूर्ती मिळण्यास पात्र राहतील. 

  1. रेनसूट – रु.५५०/– (रुपये पाचशे पन्नास) पर्यंत (वर्ष 2017 पर्यन्त)
  2. गमबूट रु.३५/- (रुपये तीनशे पन्नास) पर्यंत

5. रेनसूट’ व ‘गमबूट’ हे (दोन) वर्षाच्या प्रत्येक गटवर्षाकरिता द्यावयाचा असून चालू गटवर्ष २००६२००८ असे धरले जावे.

6. प्रशासकीय परिपत्रक क्र.६२ दिनांक ०५.०७.२००६ मधील सर्व सूचना अबाधित रहातील

7. सदर प्रशासकीय परिपत्रक .रा.वि. वितरण कं. मर्यादितच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहे.

_________________________________________________________________________________________

पात्र कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रेनसूटच्या Rain Suit च्या दरामध्ये वाढ करणेबाबत. 

 प्रशासकीय परिपत्रक क्र.५६० दिनांक १३ / ०७ / २०१७

संहिताबध्द सर्वसाधारण आदेश क्र. दि. ३१.१०.९७२ अनुसार पूर्वीच्या म.रा.वि.मंडळातील तदनंतर मंडळाच्या विभाजनानंतर कंपनीतील रेनकोट मिळण्यास पात्र कर्मचाऱ्यांना रेनसूटच्या खर्चाची प्रतिपूर्ती दोन वर्षातून एकदा मिळण्यास पात्र ठरविण्यात आलेले आहे.

हे प्रतिपूर्तीचे दर प्रशासकीय परिपत्रक क्र.१२९ दि.०२..२००७ अनुसार सुधारीत करण्यात आले असून सध्याचे कमाल दर रु.५५०/अथवा प्रत्यक्ष खर्चाची रक्कम यातील किमान असे ठरविण्यात आले होते.

सदर प्रतिपूर्तीच्या दरामध्ये वाढ करण्यबाबतचा प्रस्ताव कंपनीच्या विचाराधीन होता

. आता प्रशासकीय परिपत्रक क्र. दि. २९.०९.२००५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी संचालक (वित्त), संचालक (संचलन) आणि संचालक (प्रकल्प) यांचेशी विचारविनिमय करुन महावितरण कंपनीतील सर्व रेनसूट पात्र कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रेनसूट खरेदीच्या प्रतिपूर्तीच्या विद्यमान दरामध्ये वाढ करुन दरमहा रु. ५५०/- (रु. पाचशे पन्नास फक्त) ऐवजी चालू गटवर्षापासून दरमहा रु. ८००/-(रु. आठशे फक्त) अथवा प्रत्यक्ष खर्चाची रक्कम यातील किमान रक्कम अशा सुधारीत दराने प्रतिपूर्ती करण्यास मंजुरी प्रदान केली हे

. रेनसूट मिळण्यास पात्रतेबाबत प्रतिपूर्तीच्या कार्यपध्दतीबाबत यापूर्वी निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रक क्र. साप्रवि/सामान्य/१७२० दि..०६.१९९९, प्रशासकीय परिपत्रक क्र. ६२ दि. ०५.०७.२००६ प्रशासकीय परिपत्रक क्र. १२९ दि. ०२.११.२००७ मधील इतर सूचना अबाधित राहातील

सदर प्रशासकीय परिपत्रक कंपनीच्या RAPDRP Portal वर उपलब्ध करण्यात आले आहे.

_________________________________________________________________________________________

पात्र कर्मचाऱ्यांना  देण्यात येणाऱ्या रेनसूटच्या दरामध्ये वाढ करणेबाबत. (शुद्धिपत्रक)

शुद्धिपत्रक (प्रशासकीय परिपत्रक क्र. ५६० दि.१३/०७/२०१७)

1.कंपनीमधील सर्व ‘रेनसूट’ (Rain Suit) पात्र कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या ‘रेनसूट’ (Rain Suit) खर्चाच्या प्रतिपूर्तीचे दर चालू गटवर्षापासून प्रशासकीय परिपत्रक क्र. ५६० दि. १३/०७/२०१७ अन्वये सुधारीत करण्यात आलेले आहेत

. .सा..क्र. दि. ३१/१०/१९७२ मधील तरतुदींनुसार ‘रेनसूट’ (Rain Suit)च्या खर्चाची प्रतिपूर्ती दोन वर्षातून एकदा करण्यात येत असल्याने प्रशासकीय परिपत्रक क्र. ५६० दि. १३/०७/२०१७ मधील परिच्छेद मधील ओळ क्र. मधील ‘दरमहा’ हा शब्द वगळण्यात यावा व सदर परिच्छेद खालीलप्रमाणे वाचण्यात यावा

“आता प्रशासकीय परिपत्रक क्र. १ दि. २९.०९.२००५ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांनी संचालक (वित्त), संचालक (संचलन) आणि संचालक (प्रकल्प) यांचेशी विचारविनिमय करुन महावितरण कंपनीतील सर्व रेनसूट’ पात्र कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रेनसूट’ खरेदीच्या प्रतिपूर्तीच्या विद्यमान दरामध्ये वाढ करुन दोन वर्षातून एकदा रु. ५५०/- (रु. पाचशे पन्नास फक्त) ऐवजी चालू गटवर्षापासून दोन वर्षातून एकदा रु. ८००/-(रु. आठशे फक्त) अथवा प्रत्यक्ष खर्चाची रक्कम यातील किमान रक्कम अशा सुधारीत दराने प्रतिपूर्ती करण्यास मंजुरी प्रदान केली आहे.” 

सदर शुद्धिपत्रक महावितरण कंपनीच्या RAPDRP Portal वर उपलब्ध करण्यात आले आहे.

_________________________________________________________________________________________

 

 

 

_________________________________________________________________________________________

मित्रांनो Rain Suit अथवा Gum Boot खरेदी केल्यानंतर त्याच्या प्रतिपूर्ति साठी अर्ज करण्यासाठी खरेदी केलेल्या Rain Suit अथवा Gum Boot ची पावती अनिवार्य असेल. म्हणून खरेदी करतांना (Online खरेदी अथवा Offline) त्याची पावती जपून ठेवा.

हेही वाचा..

Dialysis या उपचारवारील खर्चाची प्रतिपूर्ति | Kidney Transplant Surgery पूर्वी-पश्चात

महावितरण कर्मचारी बदली धोरण 2020 | Mahavitran Employees Transfer Policy 2020

2 thoughts on “Raincoat | Rain Suit | Gum Boot महावितरण कर्मचाऱ्यांना पुरविणे / प्रतिपूर्ति परिपत्रके”

प्रतिक्रिया द्या

%d bloggers like this: