महावितरण कर्मचारी बदली धोरण 2020 | Mahavitran Employees Transfer Policy 2020

अनुक्रमणिका

 कंपनी अंतर्गत प्रशासकीय परिपत्रक क्र. ५१४ दि. १०.०८.२०१५ अन्वये बदली धोरण स्विकारण्यात आले आहे, सद्यस्थितीत कोवीड१९ च्या प्रादुर्भावामुळे उदभवलेली परिस्थिती आणि कंपनीची आर्थिक स्थिती विचारात घेता कंपनीने खर्चात काटकसर करण्याचे धोरण स्विकारले असून, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी संचालक (वित्त), संचालक (संचलन), संचालक (वाणिज्य), संचालक (प्रकल्प) आणि संचालक (मासं) यांच्याशी विचारविनिमय करून दिलेल्या मंजुरीनुसार, कंपनीअंतर्गत सन २०२० करीता बदली धोरण राबविण्याकरीता खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत

महावितरण बदली धोरण– 2020 

. कंपनीमध्ये संस्थात्मक कार्यक्षमतेमध्ये वाढ होण्याच्या दृष्टीकोनातून बदलीव्दारे योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी पदस्थापना करणे (प्रशासकीय बदली) अथवा कामकाजाचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्याना इच्छित स्थळी पदस्थापना मिळण्याचा पर्याय उपलब्ध करून देणे (विनंती बदली), अशा बदल्यांमुळे कंपनीचे हित जोपासले जाते

२. बदली म्हणजे हक्क नाही. विविध पदांवर कर्मचाऱ्यांना पदस्थापीत करीत असताना, प्रशासकीय गरजा विचारात घेउन संबंधित पदाचे कामकाज व्यवस्थीतरित्या पार पडण्यासाठी मनुष्यबळाचा योग्य वापर करणे ही मूलभूत बाब आहे. तथापि, शक्य तेवढया प्रमाणात कर्मचाऱ्यांच्या गरजा विचारात घेउन आणि त्यांना बदली म्हणजे शिक्षा न वाटता ते मुक्तपणे कामाला वाहून घेतील अशाप्रकारे पदस्थापना करणे आवश्यक आहे

३. ही बाब पण लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, खाली नमूद करण्यात आलेल्या धोरणांमध्ये कोणताही बदल केल्यास अशा प्रकरणी मुख्य कार्यालयाकडून गांभिर्याने विचारात घेउन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.

बदली करीत असताना एखाद्यास अवास्तव लाभ अथवा शिक्षा देणे अथवा अन्य कोणत्याही बाबी विचारात घेणे असा कोणताही प्रयत्न करण्यात येणार नाही.

कर्मचारी म्हणजे कंपनीची मौल्यवान संपत्ती असून बदली प्रकरणी अनियमिता झाल्यास कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खच्चीकरणास वाव मिळतो. समान आणि योग्य न्याय मिळणे हा कर्मचा-यांचा अधिकार आहे. यास्तव प्रत्येक सक्षम अधिकाऱ्याने बदली धोरणाची अंमलबजावणी न्यायपूर्वक करावयाची आहे.

४. यावर्षीचे बदली धोरण हे संदर्भ क्र. १ मधील प्रशासकीय परिपत्रकान्वये निर्गमित केलेल्या बदली धोरण -२०१५ व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या विविध सुधारणांशी अनुरूप ठेवण्यात आले आहे. सध्याची कोवीड – १९ मुळे उदभवलेली परिस्थिती विचारात घेता कंपनी आणि कर्मचाऱ्यांच्या हितास्तव करण्यात आलेले काही बदल है कवळ था वर्षाकरीता लागू राहतील

बदल्यांची टक्केवारी

. या वर्षी करण्यात येणाऱ्या बदल्यांमध्ये प्रशासकीय विनंती बदल्या मिळून प्रत्येक पदाच्या कार्यरत सख्येच्या १५% पेक्षा जास्त बदल्या करण्यात येणार नाहीत

आवश्यक रिक्तपदे संकल्पना आणि मार्गदर्शक तत्व:

. विविध मर्यादांमुळे बहुतांश संवर्गामधील मंजूर पदे १००% भरली जात नाही परिणामी या संवर्गांमध्ये पदे रिक्त राहतात. प्रत्येक संवर्गातील एकण रिक्तपदे विचारात घेता रिक्त ठेवण्यासाठी काही पदांची निश्चीती करणे अपरिहार्य आहे.

आवश्यक रिक्तपदांची संकल्पना म्हणजे जी पदे रिक्त ठेवणे शक्य आहे त्या पदांचे निर्धारण करणे होय. ज्यांची संख्या कमी आहे शा मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि समकक्ष अशा महत्वाच्या पदांपैकी कोणती पदे रिक्त ठेवण्यात यावीत याबाबत मुख्य कार्यालयाकडून निर्णय घेण्यात येईल.

त्याचप्रमाणे दक्षता अंमलबजावणी, विधी, जरसंपर्क आणि औद्योगिक संबंध हे छोटे संवर्ग असल्याने आणि मुख्य कार्यालय स्तरावर अशा विशिष्ट स्वरूपाच्या कामकाजाचा संबंआहे याबाबतही मुख्य कार्यालयाकडून निर्णय घेण्यात येईल.

ज्या पदांची संख्या जास्त आहे अशा अतिरिक्त कार्यकारी अभियंता समकक्ष आणि त्याखालील पदांपैकी पदनिहाय आवश्यक रिक्तपदे मुख्य कार्यालयाकडून निश्चीत करण्यात येणार नाहीत.

तथापि, या संवर्गांकरीता मुख्य कार्यालयाकडून प्रत्येक प्रदेशाकरीता टक्केवारी / संख्या स्वरूपात आवश्यक रिक्तपदे जाहीर करण्यात येतील, प्रदेशाअंतर्गत अशा आवश्यक रिक्तपदांचे वितरण व्यवस्थेच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करणे ही जबाबदारी प्रादेशिक कार्यालयांची राहील.

७. आवश्यक रिक्तपदे पुढील निकषांवर आधारीत असतील, संचलन आवश्यकते नुसार म्हणजेच महसूल, एबीआर, मेट्रो शहर (वाशी, ठाणे, कल्याण -१, गणेशखिंड, रास्तापेठ मंडल आणि नागपूर शहर मंडल), वितरण हानी, इतर शहरी तसेच ग्रामीण क्षेत्रातील महत्वाच्या बाबीनुसार प्रत्येक प्रदेशाकरीता संचालक संचलन आणि संचालक मासं हे इतर संचालक यांच्याशी विचारविनिमय करून आवश्यक रिक्तपदांची संख्या निश्चीत तसेच जाहीर करतील.

तसेच माहिती व तंत्रज्ञान, सुरक्षा व अंमलबजावणी आणि विधी संवर्गातील पदांकरीता संचालक मासं हे प्रकरणपरत्वे कार्यकारी संचालक (देवम), कार्यकारी संचालक (सुवआ, आणि मुख्य विधी सल्लागार यांच्याशी विचार विनिमय करून निर्णय घेतील.

आवश्यक रिक्तपदे जाहीर केल्यानंतरच बदल्यांबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच मुख्य कार्यालय, प्रवसु, चाचणी, वीजखरेदी, भार व्यवस्थापन (कळवा) आणि सॉफ्टवेअर विकास कक्ष याकरीता सेवावधीबाबतचे विशेष निकष आणि आवश्यक रिक्तपदे निश्चीत करण्यात येतील.

. आवश्यक रिक्तपदे म्हणजे संबंधित संवर्गातील एकूण रिक्तपदे विचारात घेउन बदल्यांची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतरही काही पदे रिक्त ठेवण्यात येतील अशी रिक्तपदे. यापुढे सदर संवर्गात सरळसेवा भरती अथवा पदोन्नतीव्दारे नविन कर्मचारी उपलब्ध झाल्याखेरीज सदर रिक्तपदे भरता येणार नाहीत.

प्रशासकीय निकड आणि मनुष्यबळ उपलब्धता विचारात घेउन सह व्यवस्थापकीय संचालक / प्रादेशिक संचालक त्यांच्या कार्यक्षेत्रातील परिमंडल कार्यालयांसाठी आणि मुख्य अभियंता त्यांच्या कार्यक्षेत्रातील मंडल विभागीय कार्यालयांसाठी आवश्यक रिक्तपदे जाहीर करतील.

आवश्यक रिक्तपदा व्यतीरिक्त उपलब्ध असणारी रिक्तपदे स्पष्ट रिक्तपदे (Clear Vacancy) म्हणून समजण्यात येतील ही स्पष्ट रिक्तपदे बदलीकरीता विचारात घेण्यात येतील.

एखाद्या कार्यालयात एखाद्या संवर्गामध्ये प्रशासकीय आवश्यकतेपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असतील उदा: आवश्यक रिक्तपदे म्हणून जाहीर करण्यात येणार आहे अशा पदांवर कर्मचारी कार्यरत असतील तर त्यांना अन्य ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या रिक्तपदावर त्यांची पदस्थापना करण्यात येईल.

परंतु या वर्षीची कोवीड , प्रसारामळे उदभवलेली विशेष परिस्थिती विचारात घेउन, एखादा कर्मचारी यापूर्वीच आवश्यक रिक्तपदावर काम करीत असेल तर त्याची प्रशासकीय कारणास्तव बदली करणे बंधनकारक असणार नाही.

सदर आवश्यक रिक्तपदावरील एखाद्या कर्मचाऱ्याची विनंतीप्रमाणे बदली झाल्यास अशा आवश्यक रिक्तपदी इतर कर्मचाऱ्याची पदस्थापना करण्यात येणार नाही. मंडल आणि विभागस्तरीय ज्येष्ठतेमधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बिंदु नामावली च्या नियमांचा भंग होणार नाही याची विशेष दक्षता घेण्यात यावी

प्रशासकीय बदल्या

९. कोरोना परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचे हित आणि संचलन आवश्यकता विचारात घेउन या वर्षी करण्यात येणाऱ्या प्रशासकीय बदल्यांचे प्रमाण हे अत्यल्प असेल.

१०. गट – १ (क) नुसार (केवळ गंभीर वैद्यकीय प्रकरणी) कर्मचाऱ्यांची विनंती बदली विचारात घेण्याकरीता त्यांनी मागणी केलेल्या ठिकाणी रिक्तपद उपलब्ध नसल्यास त्या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्याची, ज्याने जास्तीतजास्त सेवा कालावधी (आवश्यक तथा पात्र कालावधीपेक्षा जास्त) पूर्ण केला आहे अशा कर्मचाऱ्याची त्याने/ तिने सादर केलेल्या तीन पर्यायांपैकी एका ठिकाणी प्रशासकीय बदली करण्यात येईल.

तथापि रिक्तपदांनसार अशी बाब शक्य नसल्यास सदर कर्मचाऱ्याची बदली सक्षम अधिकारी अन्य ठिकाणी करू शकतील. याशिवाय व संचलन कार्याच्या आवश्यकतेशिवाय इतर कोणत्याही कारणास्तव यावर्षी कर्मचाऱ्याची प्रशासकीय बदली करण्यात येणार नाही.

विनंती बदल्या

११. दि. ३१.०३.२०२० पर्यंत केवळ मानव संसाधन प्रणालीमधून प्राप्त झालेले अर्ज विनंती बदलीकरीता विचारात घेण्यात येतील. तथापि, दि. ३१.०७.२०२० पर्यंत गटअंतर्गत गंभीर वैद्यकीय प्रकरणी प्राप्त झालेले विनंती बदली अर्ज विचारात घेण्यात यावे.

१२. प्रशासकीय बदल्या या कमीतकमी असणार आहेत याकरीता केवळ सन २०२० करीता सध्याच्या पदावरील/ ठिकाणाचा कमीतकमी सेवावधी हा ०२/०३ वर्षांवरून कमी करून ०१ वर्ष करण्यात आलेला आहे जेणेकरून जास्तीतजास्त विनंती बदली प्रकरणे निकाली काढता येतील.

१३. बदली कार्यवाही करीत असताना संबंधित अधिकारी यांनी एखादे ठिकाण कार्यालय येथे निश्चीत केलेल्या आवश्यक रिक्तपदांच्या अनुषंगाने कमीतकमी कर्मचारी संख्येपेक्षा जास्त कर्मचारी पदस्थापीत होणार नाहीत याची खात्री करावी

१४. कंपनीची बिकट अर्थिक स्थिती विचारात घेता, वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या विनंती बदली प्रकरणी देय असणारे भत्ते, बदली अनुदान यावर्षी अदा करण्यात येणार नाही. तथापि, प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना सदरचे लाभ देय असतील.

१५. सध्याच्या आणि बदलीवरील ठिकाणची आवश्यक रिक्तपदे विचारात घेउन ज्या ठिकाणी स्पष्ट रिक्तपद उपलब्ध आहे अशा ठिकाणी / कार्यालयात विनंती बदली करण्यात येईल.

विनंती बदली करीता प्राधान्यक्रम ठरविण्याच्या अनुषंगाने विनंती कारणे खालीलप्रमाणे वर्गीकरण करण्यात येत आहेत. सदरच्या प्राधान्यक्रमाची सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडून देखील अंमलबजावणी करण्यात यावी:


विनंती बदली करीता प्राधान्य क्रम

गट-१ 

(क) महाराष्ट्र शासन, शासन निर्णय क्र. एसआरव्ही/प्र.क्र.५०९/कार्या -१२ दि. १५.०५.२०१९ मध्ये अंतर्भूत असलेले आजार उदा: कर्करोग, मेंदूतील गाठ किंवा मेंदुवरील शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण आणि डायलिसीस, पक्षाघात, हृदय शस्त्रक्रिया, मनोविकार आणि निश्चेतनावस्था (Coma) – हे सर्व आजार वरील नमूद केल्याप्रमाणे गांभिर्य क्रमवारीने राहतील. या आजारांमध्ये खालीलप्रमाणे प्राधान्यक्रम असेल:

( एक ) नविन रूग्णांकरीता प्रथम प्राधान्य असेल, याकरीता निदान करण्यात आल्याची तारीख ग्राहय  मानावी

( दोन ) जुन्या रूग्णांना व्दितीय प्राधान्य असेल.

(तीन) प्रत्येक प्रकरणी प्रथम प्राधान्य हे कर्मचारी रूग्ण असल्यास असेल. तदनंतर कर्मचाऱ्याचे कुटुंबीयांपैकी रूग्ण असल्यास प्राधान्य देण्यात येईल. कुटुंबाची व्याख्या ही नुकंपा नोकरी प्रकरणी असलेल्या व्याख्येप्रमाणे असेल

(ख) दिव्यांग कर्मचारी : अपंगात्वाचे प्रमाणे ४०% किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास विनंती बदलीकरीता सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा

गट -२

() सन २०२०२१ या शैक्षणिक वर्षामध्ये ज्यांचे पाल्य इयत्ता १२ वी मध्ये शिकत आहे अशा कर्मचाऱ्यांचा या गटामध्ये समावेश असेल.

(ख) जे कर्मचारी दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीमध्ये सेवानिवृत्त होत आहेत अशा कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सध्याच्या कामाच्या ठिकाणी कमीतकमी एक वर्ष सेवा कालावधी पूर्ण केला असणे आवश्यक आहे

गट- 

() या गटामध्ये गडचिरोली, नंदुरबार, मेळघाट (अमरावती), विक्रमगड आणि जव्हार आणि मोखाडा (पालघर), रत्नागिरी, सिंधुदूर्ग या दुर्गम भागांचा आणि भरारी पथके यांचा समावेश असेल.

() कमाल सेवावधीनुसार प्राधान्यक्रम ठरविण्यात येईल. सेवाकालावधीमध्ये प्राधान्य ठरविताना महिला कर्मचाऱ्यांना पुरूष कर्मचाऱ्यांच्या सेवाकालावधीपेक्षा एक वर्षाची सवलत देण्यात येईल, परंतू अशा प्रकरणी महिला कर्मचाऱ्याने सध्याच्या ठिकाणी एक वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.

गट-४ 

वरील तीनही गटांमध्ये ज्यांचा समावेश होत नाही अशी विनंती बदली प्रकरणे या गटामध्ये समाविष्ट असतील. या गटामध्ये संवर्गातील सेवावधीनुसार ज्येष्ठता काटेकोरपणे विचारात घेउन प्राधान्य देण्यात येईल.


१६. एखाद्या प्रवर्गात ज्या क्षणी १५% ची मर्यादा पूर्ण होईल तदनंतर त्या प्रवर्गातील पुढील प्रशासकीय व विनंती बदल्या केल्या जाउ नयेत.

१७. विशेष गट मध्ये नमूद केलेल्या दुर्गम क्षेत्रामधील ठिकाणी एखाद्या कर्मचाऱ्यांने विनंती बदली मागीतली असल्यास, संबंधित कर्मचाऱ्याने सध्याच्या ठिकाणी एक वर्ष कालावधी पूर्ण केला असल्यास अशा प्रकरणी, कर्मचाऱ्याने विनंती बदली मागितलेल्या ठिकाणची रिक्तपद उपलब्धता आणि आवश्यक रिक्तपदे विचारात घेउन निर्णय घेण्यात यावा.

सेवाकालावधीची गणना

१८. दि. १५.०७.२०२० अखेर सेवाकालावधीचे गणन करण्यात येईल. विनंती बदली करीता असणारा सेवा कालावधीबाबतचा विद्यमान निकष या वर्षाकरीता / वर्षांऐवजी वर्ष असेल

बदलीविषयक कार्यवाही पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक :

१९. माहे ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवडयामध्ये नविन शैक्षणिक वर्ग सुरू होणे अपेक्षित असल्याने बदल्या तातडीने करणे आवश्यक आहे. बदल्यांची अंमलबजावणी करण्याकरीता दि. १७ ऑगस्ट २०२० हा अंतिम दिनांक असेल

बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करणे

२०. याबाबत विद्यमान नियमांनुसार कार्यवाही करण्यात येईल. तथापि, कोरोनामुळे काही समस्या उदभवल्यास संबंधित नियंत्रण अधिकारी बदलीवरील पदस्थापनेच्या ठिकाणी असणाऱ्या नियंत्रण अधिकारी यांच्याशी विचारविनिमय करून त्यानंतर सदर कर्मचाऱ्यास कार्यमुक्त करतील

बदल्यांची क्रमवारी

२१. बदल्या करीत असताना १५% मर्यादेचे उल्लंघन होउ नये याकरीता क्रमनिहाय प्रथम मुख्य कार्यालय नंतर प्रादेशिक कार्यालये आणि इतर कनिष्ठ कार्यालये याप्रमाणे बदल्या करण्यात येतील.

वरीष्ठ कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ल्यांची गणना १५% मध्ये करण्यात येईल आणि संबंधित पदाकरीता पदसंख्या शिल्लक असल्यास सदरच्या बदल्या कनिष्ठ कार्यालयांकडून करण्यात येतील.

बदल्यांकरीता सक्षम अधिकारी : 

२२.

क) मुख्य कार्यालय 

. कार्यकारी अभियंता आणि वरील अधिकारी तसेच औद्योगिक संबंध, जनसंपर्क, विधी आणि सुरक्षा अंमलबजावणी यांच्या सविस्तर पदस्थापनेसह बदल्या. . कार्य. अभियंता पेक्षा खालील कर्मचारी यांच्या केवळ आंतरप्रादेशिक बदल्या. मुख्य कार्यालय बदली करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना केवळ परिमंडलाकडे वर्ग करेल

ख) प्रादेशिक कार्यालय 

. अतिरिक्त कार्य. अभियंता समकक्ष आणि त्याखालील कर्मचारी यांच्या या धोरणानुसार प्रदेशांतर्गत 

आंतरपरिमंडलीय बदल्या (केवळ परिमंडलाकडे वर्ग करणे)

ग) परिमंडल कार्यालय 

. मुख्य अभियंता हे मुख्य कार्यालय प्रादेशिक कार्यालयाकडून वर्ग करण्यात आलेले अतिरिक्त कार्य. अभियंता समकक्ष आणि त्याखालील कर्मचारी यांच्या या धोरणानुसार परिमंडलांतर्गत शक्यतो विनंती अनुस्वरूप बदली/ सविस्तर पदस्थापना/ कनिष्ठ कार्यालयाकडे वर्ग करतील.

. या धोरणानुसार परिमंडलातर्गत वर्ग मधील कर्मचाऱ्यांना मंडलाकडे वर्ग करणे तसेच वर्ग मधील कर्मचाऱ्यांना विभागाकडे वर्ग करणे

. या धोरणानुसार वर्ग मधील कर्मचाऱ्यांच्या आंतर मंडलीय/विभागीय बदल्या.

घ) मंडल कार्यालय 

. मंडलांतर्गत वर्ग मधील कर्मचाऱ्यांना सविस्तर पदस्थापना देणे . या धोरणानुसार वर्ग मधील कर्मचाऱ्यांच्या मंडलांतर्गत बदल्या

. या धारेणानुसार वर्ग मधील कर्मचाऱ्यांच्या आंतर विभागीय बदल्या. विभागीय कार्यालय 

. परिमंडल / मंडल कार्यालयाकडून वर्ग करण्यात आलेल्या वर्ग मधील कर्मचाऱ्यांना सविस्तर पदस्थापना देणे. . या धोरणानुसार वर्ग मधील कर्मचाऱ्यांच्या विभागांतर्गत शक्यतो विनंती अनुस्वरूप बदल्या करतील

बदल्या सरळसेवा भरती : 

२३. यावर्षी होणाऱ्या सरळसेवा भरती नुसार उमेदवारांना नियुक्ती देण्यापूर्वी सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या करण्यात येतील

शीळ, मुंब्रा आणि कळवा आणि मालेगांव डीएफ

२४. सदर क्षेत्र फ्रँचायजीला हस्तांतरीत केल्यानंतर अतिरिक्त ठरणारे कर्मचारी यांना जास्तीतजास्त प्रमाणात जवळपास समायोजीत करण्याच्या दृष्टीकोनातून रिक्तपदांची उपलब्धता विचारात घेउन संबंधित मंडल, परिमंडल अथवा प्रदेशामध्ये त्यांच्या विनंतीनुसार समायोजीत करण्याचा प्रयत्न करण्यात यावा, याबाबत यापूर्वीच संबंधित सक्षम अधिकारी यांना सचना देण्यात आलेल्या आहेत

नागपूर शहर मंडल: 

२५. सदर क्षेत्र पँचायजीकडून परत घेतल्यानंतर यापर्वी एसएनडीएल ला सदर क्षेत्र हस्तांतरीत करतवळा ज्या कर्मचाऱ्यांची बाहेर बदली करण्यात आली होती प्रथम अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या विनंती आणि रिक्तपद उपलब्धतनुसार सक्षम अधिकारी यांनी बदलीवर परत घ्यावे.

पुनर्रचनेच्या मानकांनुसार जी पदे बाहयस्त्रोताव्दारे भरता येत नाहीअशी सर्व पदे नियमित कर्मचाऱ्यांमधून प्राधान्याने भरण्यात यावीत

पदोन्नतीवरील पदस्थापना: 

२६. कर्मचाऱ्यांनी केलेल्या विनंती बदली अर्जाचा जास्तीतजास्त निपटारा करण्याकरीता, पदोन्नतीवर कर्मचाऱ्यांना विविध ठिकाणी / कार्यालयात पदस्थापना देण्यापूर्वी शक्यतो सर्व विनंती बदली अर्जाचा विचार करण्यात यावा.

२७. पदोन्नती पूर्वी कर्मचाऱ्यांनी केलेल्या विनंतीचा विचार पदोन्नतीवरील पदस्थापनेवेळी करण्यात येईल, याप्रकरणी प्रणालीमधून नविन विनंती अर्ज करण्याची आवश्यकता भासणार नाही

संकीर्ण:-

२८सर्व बदली आदेश हे केवळ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणालीमधूनच निर्गमित करण्यात यावेत

२९वेतनगट मधील महिला कर्मचाऱ्यांची बदली प्रकरणे शक्यतो सहानुभूतीपूर्वक विचारात घ्यावीत

३०. मनुष्य दिवसांचा अपव्यय टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना दिवसांच्या आत सविस्तर पदस्थापनेचे आदेश देण्यात यावेत

३१. या धोरणामध्ये समाविष्ट नाहीत अशा इतर बाबींकरीता प्रशासकीय परिपत्रक क्र. ५१४ दि. १०.०८.२०१५ मधील मार्गदर्शक सूचना लागू राहतील

व्यवस्थापनाचे हक्क

३२. वर नमुद केल्या प्रकरणी तसेच इतर बाबतीत कामाच्या निकडीस्तव तरतुदींमध्ये बदल करण्याचे अधिकार व्यवस्थापनास असतील

३३. सर्व सक्षम अधिकारी यांना विनंती करण्यात येते की, सन २०२० मध्ये अधिकारी / कर्मचारी यांच्या बदल्या करीत असतांना बदली विषयक लागू करण्यात आलेल्या उपरोक्त सुधारीत धोरणातील तरतुदींचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता घ्यावी

३४सदर प्रशासकीय परिपत्रक महावितरण कंपनीच्या eLibrary वर उपलब्ध करण्यात आलेले आहे

Dwonload प्रशासकीय परिपत्रक 607 दि. 07//08/2020

 

MD India Mediclaim Policy For MSEB HCL Group 2020-21-Full Info In Marathi

1 thought on “महावितरण कर्मचारी बदली धोरण 2020 | Mahavitran Employees Transfer Policy 2020”

प्रतिक्रिया द्या

%d bloggers like this: