MD India E Card Download For MSEB Employees (2020-21)- In Marathi

MD India E Card Download करणे (2020-2021)

नमस्कार मित्रांनो!

आपल्याला MD India E Card Download कश्या प्रकारे करता येईल ह्याची माहिती ह्या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.


ज्या कर्मचाऱ्यांना 14 फेब्रुवारी 2020 नंतर वैद्यकीय उपचार MD India Mediclaim Policy मधून घ्यायेचा आहे पण MD India E Card Download कसे करावे हे माहीत नाही.Medical Insurance चा नवीन Policy Number कोणता आहे? हे माहीत नसेल तर हे आर्टिकल पूर्ण वाचा ह्यामध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे.

गरज नसताना MD India E Card Download  का करावे?

मित्रांनो आपल्यापैकी बरेचजण विचार करतात की आपल्याला जेव्हा गरज पडेल तेव्हा E Card Download करू. पण मित्रांनो कोणाला केव्हा गरज पडेल हे सांगता येत नाही. आणि आपण त्या वेळी E Card Download करण्यास सक्षम असू किव्वा नाही हेही सांगता येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपले MD India E Card Download करून किव्वा Print  काढून व्यवस्थित ठेवले पाहिजे. आणि आपल्या कुटुंबियांना सुद्धा ह्याबद्दल कल्पना देऊन ठेवलेले बरे, जेणेकरून एखाद्या आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांची किव्वा तुमची तारांबळ उडणार नाही.

MD India Mediclaim Policy साठी लागणारे E Card कसे डाउनलोड करावे?

ह्या Video मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे आपण पाहू शकता किव्वा खालील लेख पूर्ण वाचू शकता.

Step 1. खलील बटणावर क्लिक केल्यास आपल्या Mobile किव्वा Computer च्या ब्राऊजर च्या नवीन विंडो मध्ये खाली  दाखवलेले Interface Open होईल.

⇒E Card कसे डाउनलोड करा

www.artechgallery.in

Step 2. ह्या Window मध्ये आधी IC Name म्हणजेच Insurance Compony Name मध्ये The Oriental Insurance company Ltd हे सिलेक्ट करा खाली दाखविल्याप्रमाणे.

www.artechgallery.in


www.artechgallery.in


Step 3. त्यानंतर पुढील पर्याय Type of Policy मध्ये
Corporate वर टिक करा.

www.artechgallery.in

Step 4.त्यानंतर खलील पर्यायात Policy Number मध्ये

163600/48/20/06828 हा नंबर टाका.


www.artechgallery.in

Step 4. त्यानंतर MDID किव्वा Employee ID पैकी कुठेही क्लिक केल्यास खाली दाखविल्याप्रमाणे दिसेल.

www.artechgallery.in

त्यानंतर खलील पर्याय MDID OR Employee ID ह्या दोघांपैकी फक्त एक माहिती असायला हवी.

MDID हा MD India Compony ने प्रत्येक Policy धारकला व त्यावर अवलंबून असलेले जास्तीत जास्त 5 सदस्यांसाठी दिलेला असतो जो एका कुटुंबासाठी एकच MDID असतो. आपला MDID हा आपल्याला कुठे मिळेल हे मी आपल्याला पुढे सांगणार आहे.Step 5. MDID माहीत नसेल तर आपण Employee ID म्हणून आपला CPF Number वापरणार आहोत. जो आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला माहीतच असेल.

www.artechgallery.in

 

Step 6. त्यानंतर खाली निळ्या रंगाच्या   बटनावर क्लिक करा. त्यांनतर पेज लोड होऊन खाली दाखविल्याप्रमाणे Page Open होईल.

www.artechgallery.in

 


Step 7. आता वर दाखविल्याप्रमाणे कर्मचारी आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तींचे नाव व त्यांची माहिती दिसेल.

प्रत्येकाच्या नावासोमोर E Card हे पर्याय असेल. ज्याच्या  नावासोमोरील E Card वर क्लिक केले त्याचे E Card खाली दाखविल्याप्रमाणे Open होईल.Step 8. त्यानंतर E Card वर दाखविलेल्या Print वर क्लिक केल्यास E Card  Print किव्वा PDF Format मध्ये Download होईल किव्वा आपण त्याचा Screenshot सुद्धा काढून ठेऊ शकता.

www.artechgallery.in

E Card मध्ये आपला TPA ID No. आहे तोच आपला MDID असतो.

E Card  Downoad करून त्याची Print Out काढून आपण ते एक फाईल मध्ये ठेऊ शकता.

Policy चा लाभ घेण्यासाठी रुग्णालयांना आपल्याकडील खालील Documents ची आवश्यकता असते. आपण त्या सर्वांची Zerox काढून त्या एकाच फाइल मध्ये ठेऊ शकता जेणेकरून आपल्याला ऐन वेळी धावपड करावी लागणार नाही.

  1. E card
  2. Aadhar Card Copy ( रुग्णाची )
  3. Pan Card Copy ( रुग्णाची )
  4. कर्मचाऱ्याचे I Card (आवश्यक असल्यास )
  5. 2 Passport Size Fotos ( रुग्णाची )

कुटुंबातील सदस्यांचे हे Documents काढून ठेऊ शकता. आणि अधिक माहिती साथी artechgallery.in  ला भेट देऊ शकता.

आशा आहे की आपल्याला रुग्णालयची गरज भासू नये. सर्व सदा निरोगी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद.

 

3 thoughts on “MD India E Card Download For MSEB Employees (2020-21)- In Marathi”

प्रतिक्रिया द्या

%d bloggers like this: