MDIndia Mediclaim Policy For MSEB HCL Group 2020-21- (Mahavitaran)

अनुक्रमणिका

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित अंतर्गत महावितरण, महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी सन 2013-18 या कालावधीच्या वेतन पुनर्निधारण करारातील मुद्दा क्र.08  नुसार MSEB HCL Group Mediclaim Insurance Policy म्हणजेचMDIndia Mediclaim Policy सुरु करण्याबाबतचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार दि.01 जानेवारी 2015 पासून दि.14 फेब्रुवारी 2018 पर्यत तिन्ही कंपन्यांतील कार्यरत कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबित असणाऱ्या कुटुंबातील 05 सदस्यांकरिता (सदर करारातील कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे ) रु.03 लाख मूळ राशीभूत विमा रक्कमेची MDIndia Mediclaim Policy योजना सुरु करण्यात आलेली आहे.

सन 2018-19 या वर्षीच्या मेडीक्लेम योजनेच्या नुतनीकरणा वेळी सदर योजनेच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्यात येवून या योजनेमधील आजारांवरील खर्चाची मर्यादा काढण्यात यावी.

तसेच, सदर योजना रु.03 लाखांऐवजी रु.05 लाखांची करण्यात यावी. याकरिता अदा करावी लागणारी अतिरिक्त रक्कम (Extra Top Up ) कर्मचारी वैयक्तिकपणे भरतील या अटीवर मेडीक्लम योजना 2018-19 चे प्रारुप अंतिम करण्यात येवून मूळ राशीभूत विमा रक्कम (Basic Sum Assured ) रु.03  लाख व तीन लाखांपुढील रु.02 लाख Compulsory Top Up अशी एकूण रु.05 लाखांची MDIndia Mediclaim Policy योजना दि.15.02.2018 पासून सुरु करण्यात आलेली आहे.

या योजनेच्या अटी व शर्ती कायम ठेवून सदर योजना सन 2019-20 या कालावधीकरिता देखील सुरु ठेवण्यात आलेली आहे. या योजनेचा कालावधी दि.14.02.2021 रोजीच्या मध्यरात्री संपुष्टात आलेला आहे. 

MDIndia Mediclaim Policy योजना सन 2020-21 संदर्भात गठीत करण्यात आलेल्या समितीने तिन्ही कंपन्यांतील कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेनुरुप व त्यानुषंगाने केलेल्या शिफारशीनुसार दि.15.02.2020 ते दि.14.02.2021 या कालावधीकरिता तिन्ही कंपन्यांतील कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबित असणाऱ्या कुटुंबातील 05 सदस्यांकरिता मूळ राशीभूत विमा रक्कम रु.०५ लाखांची एकच MSEB HCL Group Mediclaim Insurance Policy 2020-21 सुरु करण्यासाठी मा.व्यवस्थापकीय संचालक, म.रा.वि.मं. सुत्रधारी कंपनी मर्यादित यांनी मा. अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महावितरण, महापारेषण व महानिर्मिती तसेच चारही कंपन्यांचे संचालक (वित्त) व संचालक (मासं), महावितरण तसेच कार्यकारी संचालक (मासं), महानिर्मिती / महापारेषण यांच्याशी विचारविनिमय करुन मंजूरी दिली आहे.

MDIndia Mediclaim Policy 2020-21 ची ठळक वैशिष्ट्ये 

(MDIndia Mediclaim Policy योजनेचा कालावधी दि.15.02.2020 ते दि. 14.02.2021) MSEB HCL Group Mediclaim Insurance Policy चा क्रमांक 163600/48/2020/06828 असा असून या योजनेचा कालावधी दि.14.02.2020 च्या मध्यरात्रीपासून म्हणजेच दि.15.02.2020 (00:00 तासांपासून ) ते दि.14.02.2021 च्या मध्यरात्रीपर्यंत (24:00 तासांपर्यत) असा एक वर्षाचा आहे. 

२. सदर योजना म.रा.वि.मं. सूत्रधारी कंपनी मर्या. व महावितरण कंपनीमध्ये माहे फेब्रुवारी – 2020 रोजी सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या सर्व कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबित असणाऱ्या कुटुंबातील 05 सदस्यांसाठी लागू राहील.

तसेच, सर्व संचालक, प्रतिनियुक्तीवर कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी आणि महावितरण कंपनीमधील लेखा सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक (लेखा) / (मासं), उपकेंद्र सहाय्यक, विद्युत सहाय्यक व वीजसेवक अशा विहीत पध्दतीने नियुक्त झालेल्या सर्वांना लागू राहील. 

३. सदर योजनेतंर्गत रु. 05 लाखांपर्यत कमाल वैद्यकीय विमा संरक्षण हे कर्मचारी व त्याच्यावर अवलंबित असणाऱ्या कुटुंबातील खाली नमूद कुटुंबाच्या व्याख्येतील वर्गवारीपैकी कर्मचाऱ्याने निर्देशीत केलेल्या कोणत्याही 05 सदस्यांसाठी आहे.

कुटुंबाची व्याख्या (Definition of Family)

 • कर्मचारी / अधिकारी यांची पत्नी किंवा पती.
 • कर्मचारी / अधिकारी यांवर अवलंबित असणारी औरस मुले/ सावत्र मुले / कायदेशीर दत्तक घेतलेली मुले. (तथापि, विमा कंपनीच्या नियमानुसार अवलंबित मुलांच्या बाबतीत खालील अटी लागू राहतील.)
 • 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेला मुलगा / मुलगी नोकरी करत असल्यास अथवा मुलगी विवाहीत असल्यास त्यांना अवलंबित  समजण्यात येणार नाही.
 • तथापि, 26 वर्षापर्यंत वय असलेल्या मुलाचे शिक्षण सुरु असेल व तो कर्मचाऱ्यावर पूर्णपणे अवलंबित असेल तर अशा मुलाला अवलंबित समजण्यात येईल.
 • मुलगी अविवाहीत असल्यास तिचा विवाह होईपर्यंत ती कर्मचाऱ्यांवर पूर्णपणे अवलंबित आहे असे समजण्यात येईल.
 • कर्मचाऱ्यांवर संपूर्णपणे अवलंबून असलेली मतीमंद अथवा अपंग मुले.
 • कर्मचारी / अधिकारी यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेले कर्मचारी / अधिकारी यांचे आई-वडील, महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून आणि त्यांच्याबरोबर राहत असलेल्या त्यांच्या आई-वडीलांची किंवा सासु-सासऱ्यांपैकी एकाचीच निवड करता येईल.
 • कर्मचारी / अधिकारी यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या 18 वर्ष वयाखालील अविवाहीत भाऊ.
 • कर्मचारी / अधिकारी यांच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या अविवाहीत बहिणी व घटस्फोटीत अथवा विधवा बहिणी, यांच्याबाबत त्यांचे वय लक्षात घेऊ नये.
 • या नियमाखालील प्रतिपूर्ती करण्यासाठी, कर्मचारी / अधिकारी यांची अंशकालीन नोकरी व्यतिरिक्त अन्य नोकरीस असलेली मुले आणि अविवाहीत मुली लाभदायक नोकरीत असल्याचे समजण्यात येईल आणि ती त्यांच्यावर अवलंबून असल्याचे मानण्यात येणार नाही. कर्मचारी / अधिकारी यांच्यावर अवलंबून असलेल्या आईवडीलांचे दरमहा किमान उत्पन्न अथवा मुळ निवृत्ती वेतन रु.5000/- पर्यंत आहे असे आईवडील तसेच घटस्फोटीत / विधवा बहीण हे कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहेत असे समजण्यात येईल. 

MDIndia Mediclaim Policy चे नवीन स्वरूप

तिन्ही कंपन्यांतील कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी केलेल्या मागणीनुसार मेडीक्लेम योजनेकरिता गठीत केलेल्या समितीने कामगार संघटनांच्या प्रतिनिधींशी केलेल्या चर्चेनंतर मेडीक्लेम योजना सन 2020-21 करिताच्या अटी व शर्तीमध्ये प्रामुख्याने खालील महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहे. 

मेडीक्लेम योजनेची मुळ राशीभूत विमा रक्कम रु.03लाख + रु.02 लाख अशा दोन स्वरुपात न ठेवता रु.05 लाख अशी एकरकमी करण्यात आलेली असून कर्मचाऱ्यांना रु.5 लाखांपर्यंतच्या वैद्यकीय विम्याच्या लाभाची मंजूरी दोन टण्यामध्ये घ्यावी लागणार नसल्याने तातडीने मिळेल.

रुग्णालयांतील कक्षाचे भाडे हे मूळ राशीभूत विमा रक्कमेवर आधारीत असल्यामुळे रु.3000/- वरील रुग्णालयांतील कक्ष उपचारासाठी घेतल्यास वैद्यकीय देयकांमधून टक्केवारीनुसार प्रमाणित वजावट होत असल्याने रुग्णालयांतील कक्षाच्या भाड्यांमध्ये वाढ करण्यात येवून सदर रक्कम रु. 4000/- करण्यात आलेली आहे.

मेडीक्लेम योजनेमध्ये आधुनिक शस्त्रक्रिया (Advance / Modern Surgery) तसेच कॅन्सर (Cancer) आजारावरील आधुनिक केमो उपचाराचा (Chemo Treatment) समावेश करण्यात आलेला आहे.

मेडीक्लेम योजनेमध्ये शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय व शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये आयुर्वेदिक उपचार घेतल्यास त्याची देयके विमा कंपनीच्या अटी व शर्तीनुसार देय राहील. 

मेडीक्लेम योजना सन 2020-21 करिता म.रा.वि.मं.सुत्रधारी कं.मर्या. व महावितरण या कंपन्यांमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या (सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांसह) वेतनातून माहे मार्च -2020 पासून ते माहे फेब्रुवारी -2021 पर्यंत दरमहा रु.700/- (GST सह) याप्रमाणे विमा हप्त्याची रक्कम कपात करण्यात यावी.

( सन 2020-19 योजनेसाठी कपात होत असलेली रक्कम रु.500/- + सन 2020-21 करिताच्या मेडीक्लेम योजनेसाठीच्या अनुक्रमांक 4 मध्ये नमूद केलेल्या अतिरिक्त सुविधेकरिता रु.200/- अशी एकूण रक्कम रु.700/- (GST सह) एकूण वार्षिक विमा रक्कम रु.8400/– (GST सह) अशी राहील. ) तसेच, मेडीक्लेम योजना सन 2020-21 या कालावधीत नव्याने रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून देखील सदर विमा हप्ता रक्कम कपात करण्यात यावी.

MDIndia Mediclaim Policy चा लाभ 

सेवानिवृत्त आणि मयत कर्मचाऱ्यांच्या आवलंबितांना होणार

 जे कर्मचारी माहे फेब्रुवारी – 2020 मध्ये सेवानिवृत्त झाले अथवा मयत झाले आहेत अशा कर्मचाऱ्यांना / त्याच्या अवलंबितांना (वारसांना) या आरोग्य विमा योजनेचा लाभ दि.14.02.2021 पर्यंत मिळणार असल्याने अशा कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या वेतनातून वर नमूद केल्याप्रमाणे विमा हप्ता रक्कम एकरकमी वार्षिक रु.8400/- (GST सह) सन 2020-21 च्या योजनेकरिता व सन 2019-20 च्या योजनेमधील माहे फेब्रुवारी -2020 ची दरमहा कपात रक्कम रु.500/- या प्रमाणे एकूण रक्कम रु.8900/- माहे फेब्रुवारीच्या वेतनातून कपात करुन घेण्यात यावी. 

जे कर्मचारी माहे मार्च – 2020 ते जाने – 2021 या कालावधीत सेवानिवृत्त अथवा मयत झाले असल्यास अशा कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वार्षिक विमा हप्ता रक्कमेपैकी दरमहा कपात करण्यात आलेली विमा हप्ता रक्कम वगळता उर्वरित रक्कम कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या वेतनातून कपात करण्यात यावी. 

वर नमूद केल्यानुसार मेडीक्लेम योजनेसाठी कर्मचाऱ्यांकडून वैयक्तिकपणे अदा करण्यात येणारी विमा हप्ता रक्कम आयकर कायद्याच्या कलम – 80 (D) नुसार सवलतीसाठी पात्र राहील. 

MDIndia Mediclaim Policy अंतर्गत Cashless OR Non – Cashless वैद्यकीय उपचार घेण्यासाठी कक्षाचे दर ( Room Rates )

सदर योजनेतंर्गत Cashless OR Non – Cashless वैद्यकीय उपचार घेण्यासाठी रुग्णालयामध्ये दाखल झाल्यानंतर उपचारासाठी देण्यात येणाऱ्या कक्षाचे दर खालीलप्रमाणे राहतील. 

 • सामान्य कक्ष (General Room) : Room Rent limited to 0.80% of Sum Insured (Rs. 4000/-) or Actual expenses whichever is less.
 • अति दक्षता विभागातील कक्ष (ICU Room): Room Rent limited to 1.60% of Sum Insured (Rs. 8000/-)  or actual expenses whichever is less.

कर्मचाऱ्याची सेवा समाप्ती (Termination) झाल्यास अथवा राजीनामा (Resigned) दिल्यास

म.रा.वि.मं. सुत्रधारी कं.मर्या व महावितरण कंपन्यांतील कर्मचाऱ्यांची सदर योजनेच्या कालावधीमध्ये सेवा समाप्ती (Termination) झाल्यास किंवा कर्मचाऱ्याचा राजीनामा स्विकारल्यास  अशा कर्मचाऱ्याच्या अवलंबितास या योजनेचा लाभ उर्वरित कालावधीसाठी मिळणार नसल्याने याबाबतची कार्यवाही करण्यासंदर्भातील दक्षता संबंधीत विभागाने घ्यावी. 

सबब, ज्या – ज्या सक्षम अधिकाऱ्यांमार्फत सेवा समाप्ती किंवा राजीनामा प्रकरणी आदेश निर्गमित करण्यात येतील अशा प्रकरणांची माहिती संबंधीत परिमंडळ कार्यालयांच्या मानव संसाधन विभाग प्रमुखाने (सांघिक कार्यालयाकरिता प्रकरण परत्वे मुख्य महाव्यवस्थापक (मास) / (तांत्रिक आस्था) / (वित्त व लेखा) यांच्या विभागांमार्फत) दरमहा तातडीने मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांना ईमेलद्वारे [email protected] यावर पाठवावी.

वर नमद केल्यानसार संबंधीत कर्मचाऱ्यांची माहिती (निरंक असेल तरीही) दरमहा न कळविल्यास सदर बाबत जबाबदारी निश्चित करण्यात येवून यानुषंगाने, कंपनीवर येणाऱ्या आर्थिक भाराची वसूली संबंधीत प्रकरणी जबाबदार असणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येईल याची नोंद घ्यावी. 

महावितरण कंपनीतील सर्व सहाय्यक प्रवर्गाच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर रु.700/- इतकी रक्कम आरोग्य विमा अनुदान म्हणून माहे मार्च – 2020 ते माहे फेब्रुवारी – 2021 या कालावधीकरिता वेतनातून अदा करण्यात येईल.

वर नमूद केल्यानुसार विमा हप्त्याची दरमहा अथवा एकरकमी कपात केलेली रक्कम महावितरण कंपनीच्या मुख्य महाव्यवस्थापक (सां.ले.) यांच्या निर्देशानुसार ERP-10902351 या खाते शिर्षकाखाली (Account Head) जमा करण्यात यावी. 

या योजनेमध्ये आजारांवरील खर्चाची मर्यादा (Diseasewise Capping) काढण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये कर्मचाऱ्यास किंवा त्यांच्या अवलंबितास पूर्वी असलेल्या आजारांचा समावेश करण्यात आलेला आहे. (Pre-existing Diseases Covered) 

या योजनेमध्ये पहिल्या 30 दिवसांपर्यतचा आणि योजना सुरु झाल्यापासून पहिल्या 02 ते 04 वर्षापर्यंतचा प्रतिक्षा कालावधी शिथिल / माफ करण्यात आलेला आहे. (1st_30 days & upto 02 to ()-4 years waiting. period waived off ) 

या योजनेतंर्गत रुग्णालयामध्ये दाखल होण्यापूर्वी 30 दिवसांपूर्वीचा व रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतरच्या 60 दिवसांपर्यंत केलेल्या उपचारासाठीच्या वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देय आहे. (Pre hospitalisation upto 30 days and post hospitalisation upto 60 days Covered) 

कर्मचारी व त्यांच्यावर अवलंबित असणाऱ्या कुटुंबातील 05 सदस्यांना MDIndia (IPA) कंपनीच्या नेटवर्क रुग्णालयामध्ये (महावितरण कंपनीच्या Employee Portal  अंतर्गत Medi Clam या शिर्षकाखाली List of Hospitals यामध्ये नेट वर्क रुग्णालयांची यादी पहावयास मिळेल) वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस (Cashless Service For medical Treatment) सेवेचा लाभ मिळेल. तसेच विना नेटवर्क रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यास सदर योजनेच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून वैद्यकीय उपचाराची अनुज्ञेय प्रतिपूर्ती The Oriental Insurance Company Ltd., Pune या विमा कंपनीकडून MDIndia (TPA) कंपनीच्या मार्फत कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात अदा केली जाईल. 

MDIndia Mediclaim Policy साठी अवलंबित सदस्यांची व इतर माहिती अद्ययावत करणेबाबत 

सदर योजनेसाठी दि.15.02.2020 रोजी कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दि.15.02.2020 ते दि.14.02.2021 या कालावधीकरिता कुटुंबातील नवीन अवलंबित सदस्यांच्या नावाचा समावेश अथवा नोंदणीकृत सदस्यांपैकी एखाद्या सदस्यांची नोंदणी कायमस्वरुपी काढून टाकणे इ. करिता महावितरण Employee Portal अंतर्गत Mediclaim या शिर्षकाखाली Registration या पर्यायानुसार सुधारीत करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

सदर माहिती भरल्यानंतर व ती Submit करुन Confirm केल्यानंतर कर्मचाऱ्यांना योजनेच्या कालावधीमध्ये कुठल्याही सदस्यांचा पुन्हा नव्याने समावेश करता येणार नाही. 

मात्र, नवविवाहीत सदस्याच्या बाबतीत (लग्न झालेल्या तारखेपासून) व नवजात बालकाच्या बाबतीत (जन्म झालेल्या दिवसापासून 30 दिवसांनतर) सदस्यांची माहिती कर्मचाऱ्यांना त्या-त्या वेळेस भरता येईल. याकरिता, कर्मचाऱ्यांनी संबंधीत सक्षम अधिकाऱ्याकडून प्रमाणित केलेली सदस्यांच्या नावांची Excel Sheet संबंधीत परिमंडळाच्या उपमुख्य औद्योगिक सबंधं अधिकारी यांना ईमेलद्वारे पाठवावी. उपमुख्य औद्योगिक सबंधं अधिकारी यांनी सदर अवलंबितांची माहिती [email protected] यावर ईमेल करुन कर्मचाऱ्यांच्या अवलंबितांची नोंद झाल्याची खात्री करावी.

सामान्य आदेश क्र. २० (क) च्या तरतूदी – (फक्त कर्मचाऱ्यांबाबत)

 वैद्यकीय सुविधा – कंपन्यांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीकरिता सर्वसाधारण आदेश क्र. २०(क), दि. १७/०७/१९६३ मधील तरतुदीनुसार देण्यात येणारा लाभ पूर्वीप्रमाणेच चालू राहील, त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. मात्र कर्मचाऱ्यांस रु.05 लाखांपर्यंत वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा लाभ सुरुवातीस MSEB HCL Group Mediclaim Insurance Policy द्वारेच घ्यावा लागेल.

कर्मचाऱ्यांकरीता स्वत:साठी रु.05 लाखांपेक्षा जास्त झालेल्या प्रत्यक्ष वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी सामान्य आदेश क्र.20 (क) प्रमाणे लाभ देय राहील. 

मात्र, सदर प्रकरणी केवळ कर्मचाऱ्यांकरीता वैद्यकीय उपचारासाठी झालेल्या प्रत्यक्ष खर्चाची रक्कम ही विमा कंपनीकडून या योजनेच्या अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यात आलेल्या रक्कमेपेक्षा जास्त असल्यास अशा प्रकरणात स. स्था.आ.क्र.३७७, दि.३०.८.१९५८ चे सुधारपत्र क्र.१२, दि.१२.०२.१९९८ व सा.आ. क्र २० (क) दि. १७.६.१९६३ तसेच प्रशासकीय परिपत्रक क्र.२७२ दि.३०.१२.२००९ मधील तरतूदीच्या अधीन राहून संबंधीत सक्षम अधिकारी प्रकरणपरत्वे निर्णय घेतील.

वैद्यकीय अग्रीम ( Medical Advance)

कर्मचाऱ्यांना कामावर असताना अपघात झाल्यास अथवा तातडीच्या प्रसंगी ज्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले ते रुग्णालय कॅशलेस मेडीक्लेमसाठी MDIndia Company च्या  मान्यताप्राप्त रुग्णालयामध्ये नसेल तर परिमंडल कार्यालयांकरिता उप मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांनी व अन्य कार्यालयांच्या बाबतीत संबंधीत विभागातील मानव संसाधन विभाग प्रमुखांने कर्मचाऱ्याच्या सदर प्रकरणाची माहिती MDIndia कंपनीस दूरध्वनीद्वारे (MSEB Mediclaim Help Line No. 1800 209 7900) देवून 24 तासांच्या आत प्राथमिक दावा / सुचनांच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांचे नाव, भ.नि.नि. क्रमांक CPF No., रुग्णाचे नाव, रुग्णालयाचे नावं व पत्ता इ. माहितीचा ईमेल देखील [email protected] यावर पाठवावा.

त्यानंतर, स. स्था. आ. क्र. ३७७, दि. ३०.८.१९५८ चे सुधारपत्र क्र. १२, दि. १२.०२.१९९८ व सा.आ.क्र.२०(क) दि.१७.६.१९६३ तसेच प्रशासकीय परिपत्रक क्र.४७७ दि. ०४.०१.२०१४ मधील तरतूदीच्या अधीन राहून संबंधीत सक्षम अधिकारी यांनी प्रकरण परत्वे कर्मचाऱ्यास वैद्यकीय उपचारासाठी अग्रीम रक्कम मंजूर करावी. 

कर्मचाऱ्यास वरील प्रकरणी वैद्यकीय अग्रीम महावितरण कंपनीकडून मंजूर करण्यात आला असल्याच सुचना MDIndia कंपनीस ईमेलद्वारे [email protected] द्यावी. 

अप्राणांतिक अपघाताच्या अथवा इतर तातडीच्या आजारांच्या घटनेमध्ये प्रकरणपरत्वे रुग्णालयास कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय उपचारासाठी कंपनीकडून अग्रीम रक्कम दिलेली असल्यास कर्मचाऱ्यांने रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge) दिल्यानंतर तातडीने वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव (Medical Reimbursement Proposal) संबंधीत कार्यालयाकडे सादर करावा. संबंधीत कार्यालयाने सदर प्रस्तावासोबत वैद्यकीय अग्रीम म्हणून रुग्णालयास अदा केलेल्या रक्कमेच्या पावतीची छायांकित प्रत व संबंधीत कार्यालयाचा बँक खाते क्रमांकासह IFSC Code ची माहिती देवून सदर प्रकरणी मंजूर होणारी रक्कम कार्यालयाच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठीचे स्वतंत्र पत्र जोडून प्रस्ताव कार्या MDIndia कंपनीकडे पाठवावा.

MDIndia कंपनीकडून या प्रकरणी मंजूर रक्कम संबंधीत कार्यालयाच्या बँक खात्यावर जमा होईल, त्यानंतरच संबंधीत कार्यालयाने अग्रीम / वैद्यकीय प्रतिपूर्ती रक्कमेचा लेखा पूर्ण करावा.

सदर रक्कमेच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीबाबत संबंधीत कार्यालयाच्या मानव संसाधन विभाग प्रमुखाने MDIndia कडे पाठपुरावा करावा या प्रकरणी संबंधीत परिमंडळांतील उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांचे सहकार्य घ्यावे. 

प्राणांतिक अपघाताच्या घटनेमध्ये अथवा वैद्यकीय उपचाराप्रसंगी दुर्देवाने मृत्यु झाल्यास अग्रीम रक्कम मंजूर करुन रुग्णालयास सदर रक्कमेचा धनादेश अदा केला असल्यास अशा प्रकरणी वैद्यकीय अग्रीम / वैद्यकीय प्रतिपूर्ती रक्कमेचा लेखा पूर्ण होईपर्यंत कर्मचाऱ्यांच्या अवलंबितास तितक्या रक्कमेची देयके अदा करण्यात येवू नये.

वैद्यकीय प्रतिपूर्ती (Medical Reimbursement)

 • कर्मचारी / कुटुंबीयाने MDIndia कंपनीच्या मान्यताप्राप्त रुग्णालयामध्ये उपचार घेतले नसतील व सदर रुग्णालय कॅशलेस मेडीक्लेमसाठी नसेल तर कर्मचारी / कुटुंबातील सदस्यांने MDIndia कंपनीकडे MSEB Mediclaim Help Line No. 1800 209 7900 यावर दुरध्वनीद्वारे अथवा ईमेलद्वारे 24 तासांच्या आत प्राथमिक दाव्याबाबत १४.२ च्या ‘अ’ मध्ये नमूद केल्यानुसार सुचना द्यावी. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तातडीने झालेल्या वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीचा प्रस्ताव  Proposal for Reimbursement of Medical Expenses MDIndia कंपनीकडे प्रतिपूर्ती दावा (Reimbursement Claim )कार्यपध्दतीमध्ये नमूद केल्यानुसार (MDIndia कंपनीच्या संकेतस्थळावर नमूद केल्यानुसार) योग्य ती सर्व कागदपत्रे जोडून संबंधीत कार्यालय व समन्वय अधिकारी (Nodal Officer) यांचेमार्फत पाठविणे बंधनकारक आहे.
 • सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर MDIndia कंपनीकडून या योजनेच्या अटी व शर्तीच्या अनुषंगाने रु. 05 लाख मर्यादेपर्यंत वैद्यकीय प्रतिपूर्ती रक्कम मंजूर केली जाईल. सदर रक्कम कर्मचाऱ्याने अथवा अवलंबितांने प्रस्तावासोबत दिलेल्या IFSC Code नुसार बँकेच्या खात्यावर MDIndia कंपनीकडून परस्पर वर्ग करण्यात येईल.
 • कार्यरत कर्मचाऱ्यास कामावर असताना अपघात झाल्याप्रकरणी अथवा तातडीच्या प्रसंगी कर्मचाऱ्यास वैद्यकीय अग्रीम अदा केला असल्यास १४.२ च्या ‘ड’ व ‘इ’ मध्ये नमूद केल्यानुसार कार्यवाही करावी.
 • उपरोक्त प्रकरणी वैद्यकीय उपचारासाठी फक्त कर्मचाऱ्यांसंदर्भात प्रत्यक्षात झालेल्या एकूण खर्चाची रक्कम ही रु. 05 लाख यापेक्षा जास्त असल्यास सदर प्रकरणी स.स्था.आ.क्र.३७७, दि.३०.८.१९५८ चे सुधारपत्र क्र.१२, दि.१२.०२.१९९८ व सा.आ.क्र.२० (क) दि.१७.६.१९६३ तसेच प्रशासकीय परिपत्रक क्र.२७२ दि.३०.१२.२००९ मधील तरतूदीच्या अधीन राहून संबंधीत सक्षम अधिकाऱ्यांनी वैद्यकीय प्रतिपूर्ती मंजूर करुन वैद्यकीय प्रतिपूर्ती रक्कमेचा लेखा पूर्ण करावा. 

कर्मचाऱ्याच्या वैद्यकीय उपचारापोटी या योजनेतंर्गत उपलब्ध असलेली विमा रक्कम रु.05 लाख कंपनीच्या कार्यरत कर्मचाऱ्यासाठी खर्च झालेली असल्यास व तद्नंतर कर्मचाऱ्यांवर अवलंबित असणाऱ्या 05 सदस्यीय कुटुंबियांपैकी कुठल्याही व्यक्तीस उपचाराची आवश्यकता असल्यास अशा प्रकरणी कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांकरिता रु.05 लाखापर्यंतच्या वैद्यकीय विम्याचा लाभ एक विशेष बाब म्हणून उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. 

याकरिता, संबंधीत कार्यालयाने परिमंडळांच्या मुख्य अभियंता यांच्यामार्फत त्याबाबतचा प्रस्ताव मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, सांघिक कार्यालय, मुंबई यांचेकडे पाठवावा.

सदर प्रस्तावास संचालक (वित्त) हे संचालक (मासं) व मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी यांचेशी विचारविनिमय करुन मंजूरी देण्यासाठीचे सक्षम अधिकारी राहतील. 

Additional Value Top Up Premium वेतनातून कपात करण्याची संमती देणेबाबत

ज्या कर्मचाऱ्यांना मुळ राशीभूत विमा रक्कम रु.05 लाखांच्या रक्कमेपेक्षा जास्त रक्कमेचा म्हणजेच, रु. 05 लाख पुढील रक्कमेचा अतिरिक्त विमा (Additional Value Top Up) घ्यावयाचा असल्यास कर्मचाऱ्यांना विमा रक्कम रु.01 लाख ते रु.10 लाख यापैकी एका विकल्पाची निवड करावयाची आहे. 

याकरिता कर्मचाऱ्यांनी महावितरणच्या Employee Portal अंतर्गत Mediclaim या शिर्षकाखाली Application for Additional Value Top Up या पर्यायानुसार रु.05 लाखांपुढील रक्कमेचा अतिरिक्त विमा (Additional . Value Top Up) करिता रु.01 लाख ते रु.10 लाख यापैकी एका विकल्पाची निवड दि.१७.०३.२०२० पर्यंत करावयाची आहे.

सदर विकल्पाची निवड केल्यानंतर Submit करुन Confirm करावयाचे आहे. कर्मचाऱ्यांनी ज्या Additional Value Top Up विकल्पाची निवड केली असेल त्याकरिता येणारी वार्षिक विमा हप्त्याची रक्कम GST सह एकरकमी कर्मचाऱ्यांच्या माहे मार्च-2020 च्या वेतनातून कपात करण्यात येईल, याबाबतची नोंद कर्मचाऱ्यांनी घ्यावी.

(सदर कालावधीनंतर कुठल्याही परिस्थितीत सदर विकल्पाची निवड करण्याची सुविधा उपलब्ध होणार नाही.) 

Additional value Top Up विकल्प रु. 01 लाख ते रु. 10 लाख करिता अतिरिक्त वार्षिक विमा हप्ता.

MDIndia Mediclaim Policy Top Uop Chart

सदर योजना दि.15.02.2020 पासून सुरु झालेली असून वर नमूद केल्यानुसार माहे मार्च – 2020 च्या वेतनातून कपात केलेली Additional value Top Up करिता वर्षभराची रक्कम ही विमा कंपनीस माहे एप्रिल- 2020 मध्ये अदा करण्यात येवून त्याचा लाभ दि.15.04.2020 पासून पुढील वर्षभराच्या कालावधीसाठी देय राहणार आहे याची कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी.

कर्मचारी व कुटुंबियांच्या सुविधेकरिता The Oriental Insurance Company Ltd. PuneMDIndia Health Insurance Pvt. Ltd. (T.P.A.) यांचे मार्फत सर्व परिमंडल कार्यालयात MDIndia कंपनीचा प्रतिनिधी समन्वय अधिकारी (Nodal Officer) म्हणून उपस्थित असतील.

कर्मचाऱ्यांनी MSEB HCL Group Mediclaim Insurance Policy संदर्भातील अडचणी सोडविण्याकरिता या समन्वय अधिकाऱ्यांची मदत घ्यावी. 

कर्मचाऱ्यांना MSEB HCL Group Mediclaim Insurance Policy संदर्भात स्पष्टीकरण, माहिती किंवा रुग्णालयात दाखल होण्यासाठी अथवा वैद्यकीय प्रतिपूर्तीचा दावा दाखल करण्यासाठी करावयाच्या प्रक्रियेकरिता मदतीची अथवा चौकशीची गरज असल्यास कर्मचारी अथवा त्याचे कुटुंबिय MDIndia (T.P.A.) कंपनीच्या बहुभाषीक ग्राहक सेवा केंद्राशी खाली नमूद केल्यानुसार संपर्क / संवाद करु शकतात. 

√ सर्व साधारण चौकशी व कॅशलेस सुविधेच्या सवलतीसाठी हेल्पलाईन क्र. – 1800 209 7900

√ रुग्णालयात दाखल झाल्याची सूचना देण्यासाठी ईमेल – [email protected] 

√ या योजनेकरिता असलेल्या Enrollment संदर्भातील काही अडचणी अथवा सुधारणा असल्यास त्याकरिता ईमेल – [email protected]


टिप :- Enrollment – (Addition / Deletion) संदर्भातील अडचणी लक्षात घेता कर्मचारी व कुटुंबियांच्या सुविधेसाठी Enrollment करिता स्वतंत्र ईमेल (m[email protected]dindia.com) तयार करण्यात आलेला असून Enrollment संदर्भातील विषयासाठी ईमेल पाठविताना कर्मचाऱ्यांनी CPF No., वीजसेवकांनी Employee No. ईमेलच्या Subject मध्ये नमूद करणे बंधनकारक आहे. 


MDIndia कंपनीसोबत पत्रव्यवहार व वैद्यकीय प्रतिपूर्तीचे दावे दाखल करण्यासाठीचा पत्ता 

MDIndia Health Insurance (TPA) Pvt. Ltd. MSEB HCL GMC Claims Department 

पहिला मजला, कर्नावत टॉवर, पौड फाटा, दशभुजा गणपती मंदिरच्या मागे, देना बँकेच्या वर,

पुणे- ४११०३८.

MD India Mediclaim साठी लागणारे E Card Download करणे

MDIndia Hospital List  पाहणे

महावितरण चे सदर परिपत्रक Download करण्यासाठी क्लिक करा.

3 thoughts on “MDIndia Mediclaim Policy For MSEB HCL Group 2020-21- (Mahavitaran)”

प्रतिक्रिया द्या

%d bloggers like this: