बदली (Transfer) विषयक सुधारित धोरण-प्रशासकीय परिपत्रक क्र. 514 दि.10/08/2015

अनुक्रमणिका

बदली विषयक महावितरण चे सुधारित धोरण. – प्रशासकीय परिपत्रक क्र. 514 दिनांक 10/08/2015


 1. महावितरण कंपनीमध्ये विविध पदांवर स्तरांवर कार्यरअधिकारी/कर्मचारी यांच्या कामाच्या संदर्भावैविध्य आणण्याकरिता तसेच कर्मचाऱ्यास ज्ञान आणि कौशल्याची संधी मिळावी सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवांचा पर्याप्त सुयोग्य वापर व्हावा या दृष्टीकोनातून बदली विषयक धोरण राबविण्यात आले आहे.
 2. कंपनीच्या संचालक मंडळाने ठराव क्रमांक ४५१ दिनांक ०६.०७.२०१५ अन्वये महावितरण कंपनीमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बदली संदर्भात सुधारित धोरण लागू करण्यास मंजुरी प्रदान केली आहे. या अनुषंगाने महावितरण कंपनीचे बदलीविषयक सुधारित धोरण-२०१५ सोबत जोडलेल्या परिशिष्ट ‘अ’ प्रमाणे लागू करण्यात येत आहे.
 3. सर्व सक्षम अधिकारी यांना विनंती करण्यात येते की, अधिकारी/कर्मचारी यांच्या बदल्या करताना बदली विषयक लागू करण्यात आलेल्या सुधारित धोरणामधील तरतुदींचे तंतोतंत पालन होईल याबाबत दक्षता घेण्यात यावी.
 4. सदर प्रशासकीय परिपत्रक महावितरण कंपनीच्या R-APDRP Portal वर उपलब्ध करण्यात आले आहे.

परिशिष्ट

महावितरण कंपनीचे बदलीविषयक सुधारित धोरण – 2015

. .रा.वि.वि.कं.. ही आशिया खंडातील सर्वात मोठी विद्युत वितरण कंपनी आहे. सातत्यपूर्ण विकासाचा एक भाग म्हणून आणि कर्मचाऱ्यास ज्ञान आणि कौशल्याची संधी मिळावी त्याच्या स्वाभाविक प्रवृत्तीस वाव मिळावा यासाठी कामात आळीपाळीने बदल करण्याच्या दृष्टीकोनातून कर्मचाऱ्यांच्या बदलीचे धोरण राबविणे आवश्यक 

आहे. जे कर्मचारी ठराविक परिसरात वर्षानुवर्षे कार्यरत आहेत, त्यांना या योजनेनुसार अन्यत्र आळीपाळीने बदली (Transfer)करणे शक्य होईल त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर प्रत्येक कर्मचाऱ्याच्या संदर्भात वैविध्य आणणे शक्य होईल.

बदली (Transfer)विषयक धोरण राबविताना पारदर्शकता रहावी समन्यायी संधी मिळावी या दृष्टीकोनातून बदली (Transfer) धोरण तयार केले आहे

सर्वसाधारण बदल्यांबाबतची मार्गदर्शक तत्त्वे प्रत्येक वर्षाच्या एप्रिल/मे महिन्यात केल्या जाणाऱ्या सर्वसाधारण बदल्यांबाबत खालील मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करण्यात येईल

() प्रत्येक पदाकरिता सर्वसाधारणपणे पदावधी हा वर्षाचा असेल. मात्र, अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत सदरचा कालावधी हा वर्षापर्यंत वाढविण्याचे अधिकार सक्षम प्राधिकाऱ्यांना राहतील.

() एकाच मुख्यालयात/परिमंडळात/मंडळात/विभागात/उप विभागात ज्या कमाल कालावधीसाठी सलग कार्यरत राहता येईल तो संवर्गनिहाय कालावधी खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे

 

वरील तक्त्यात निगम कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निगम कार्यालय हे एक स्वतंत्र परिमंडळ मानण्यात येईल त्या अंतर्गत निगम कार्यालयातील मंडळ/विभाग/उप विभाग हे वरीलप्रमाणे कार्यक्षेत्र म्हणून विचारात घेण्यात येईल

बदली (Transfer) विषयक धोरण एकाकी पदास लागू राहणार नाही

(सदर कालावधी दरवर्षी ३१ मे रोजी परिगणीत केला जाईल

(वरील बाब खालील उदाहरणावरुन अधिक स्पष्ट होईल

(एकूण बदली (Transfer)होणाया कर्मचायांची संख्या त्या त्या प्रवर्ग/संवर्गातील एकूण कार्यरत कर्मचायांच्या संख्येच्या ३०% पेक्षा जास्त असणार नाही. प्रत्येक वेतनगटाच्या ३० % अशी परिगणना करता प्रत्येक पदाच्या ३० % अशी परिगणना करावी.

उदा.वेतनगट मध्ये लिपिक, तंत्रज्ञ इत्यादी पदे असल्याने लिपिकांसाठी ३० % स्वतंत्र, तंत्रज्ञांसाठी ३० % स्वतंत्र असा विचार व्हावा. अशा बदल्या संबंधीत कर्मचारी परिमंडळ/मंडळ/ विभागामध्ये व्या/व्या वर्षी कार्यरत असताना करण्यात येयेत. ज्या कर्मचायांना अलिकडेच दोन्नतीवर त्याच मुख्यालयात पदस्थापना देण्यात आली आहे अशा कर्मचायांना नवीन पदावर एक वर्ष पूर्ण करण्यास मुभा देण्यात येत आहे

(ज्या संवर्ग/प्रवर्गासंदर्भात मंडळ कार्यालय तत्सम निम्नस्तरावरील कार्यालयात नियुक्ती होत नाही, तसेच ज्या संवर्गाची मंजूर पदसंख्या ५० पेक्षा मी आहे अशा संवर्ग/प्रवर्गाकरिता एक दावधी हा वर्षाऐवजी वर्षे इतका निश्चित करण्यात येत आहे.

अशा अधिकारी /कर्मचारी यांचे संदर्भात ६ वर्षानंतर परिमंडळ बदलणे आवश्यक राहील. जे कर्मचारी कोकण परिमंडळ आणि नक्षलग्रस्त भागात काम करण्यास स्वतःहून तयारी दर्शवतील अशा कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाच्या निकडीनुसार त्या क्षेत्रात काम करण्यास परवानगी देण्यात येईल

(एखाद्या परिमंडळातील सेवाकालाच्या गणनेकरीता परिमंडळ विभाजीत होऊन नव्याने अस्तित्वात आले असल्यास विभाजनापुर्वी कर्मचारी कार्यरत असलेल्या मुख्यालयाचे ठिकाण सध्या कोणत्या परिमंडळात येते हे विचारात घेऊन कार्यकाल गणन्यात यावा.

याचाच अर्थ संबंधित मुख्यालय हे सध्या ज्या परिमंडळात येते त्या परिमंडळाचे अस्तित्व नियुक्तीच्या पुर्वीच्या कालावधीच्या वेळी नसले तरी सदर कालावधी हा सदर मुख्यालय हे आज ज्या परिमंडळात आहे, त्या परिमंडळाचे क्षेत्र म्हणून गणला जाईल.

उदा.नाशिक परिमंडळांतर्गत अहमदनगर, नाशिक शहर नाशिक ग्रामिण ही मंडळे आणि जळगाव परिमंडळांतर्गत जळगाव, धुळे नंदुरबार ही मंडळे दि.१५.०७.२००९ रोजी अस्तित्वात आली.

त्यापुर्वी ही सर्व मंडळे नाशिक परिमंडळात समाविष्ट होती. त्यामुळे जळगाव, धुळे नंदुरबार या मंडळांतर्गतचा सन २००९ पुर्वीचा कार्यकाल तद्नंतर आजपर्यंतचा कार्यकाल हा जळगाव परिमंडळातील कार्यकाल म्हणून गणन्यात यावा आणि नाशिक परिमंडळातील कार्यकाल म्हणून गणन्यात/संबोधण्यात येऊ नये

याच धर्तीवर नवीन मंडळ / विभाग / उपविभाग /शाखा इत्यादी घटकांसाठी निर्णय घ्यावा

(झ) अतिरिक्त कार्यकारी अभियंता किंवा तत्सम (वेतनगट मधील पद) त्यावरील पदांच्या संदर्भात पदोन्नती/सरळसेवा भरतीअंतर्गत पदस्थापना/प्रथम नियुक्ती परिमंडळाबाहेर देण्यात येईल.

तथापि वेतनगट मधील ज्या अधिकाऱ्यांची अशा प्रकरणांच्या मागील एका वर्षामध्ये परिमंडळाबाहेर बदली (Transfer)झालेली आहे, त्यांना पदोन्नती/नियुक्ती रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार कार्यरत असलेल्या परिमंडळांतर्गत देण्यात येईल.

अशा समयी पाल्य १२ वी मध्ये आहे, गंभीर आजारपण आहे आदि मुदयांमुळे त्याच परिमंडळात नियुक्तर दयावी अशा मागणींचा विचार केला जाणार नाही

(ट)  वेतनगट मधील राज्यस्तरीय सेवाज्येष्ठतेमधील कर्मचाऱ्यांना पदोन्नती किंवा सरळसेवा भरतीअंतर्गत पदस्थापना/नियुक्ती रिक्त पदाच्या उपलब्धतेनुसार शक्यतो कार्यरत असलेल्या परिमंडळामध्ये देण्यात येईल.

तथापि, ज्यांची यापुर्वी परिमंडळाबाहेर पदस्थापना/बदली (Transfer)करण्यात आलेली आहे अशा कर्मचाऱ्यांचे विनंती बदली (Transfer)अर्ज, अशी विनंती बदली (Transfer)करण्यास सक्षम असलेल्या समितीमार्फत आगामी बैठकीमध्ये विचारात घेण्यात येतील

() सर्वसाधारण बदली (Transfer)कालावधी वगळता ज्या ज्या वेळी विनंती बदलीबाबतचे अर्ज विचारात घेणे आवश्यक वाटते, त्या त्या वेळी .रा.वि.वि.कं.मर्या., कर्मचारी सेवाविनियम२००५ शी संलग्नित पाचव्या अनुसूचीमध्ये विहीत केलेल्या सक्षम अधिकारी यांच्या लगत वरिष्ठ असलेले अधिकारी हे अशा बदल्या करण्यास सक्षम अधिकारी असतील

(ड) जे कर्मचारी पुढील दोन वर्षामध्ये सेवानिवृत्त होहेत अशा कर्मचाऱ्यांची सामान्यतः बदली (Transfer)करण्यात येऊ नये

(ढ) बदली (Transfer)करावयाच्या एकूण कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता, सेवेचा दीर्घ कालावधी पूर्ण केलेल्या जेष्ठ कर्मचाऱ्यांचा प्रथम विचार केला जावा त्यानंतर त्यांच्यापेक्षा कनिष्ठ कर्मचाऱ्यांचा उतरत्या क्रमाने बदलीसाठी विचार केला जावा

(त) एखाद्या प्रवर्ग/संवर्गातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची संख्या एकूण कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या ३०% पेक्षा कमी असेल अशावेळी फक्त बदलीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांचीच बदली (Transfer)करण्यात यावी

(वेतनगट , वेतनगट २ व राज्यस्तरीय सेवाजेष्ठता असलेल्या वेतनगट मधील अधिकारी कर्मचाऱ्याची नेमणूक शक्यतो त्यांच्या मुळ रहिवासाच्या ठिकाणी करू नये

(सर्व स्तरावरील अधिकारी कर्मचारी यांच्या कामाच्या स्वरूपात/ठिकाणात आळीपाळीने बदल करण्यात येत असल्याची खातरजमा करावी.

(मंडलनिहाय ज्येष्ठता यादीतील कर्मचाऱ्यांची बदली (Transfer)मंडलांतर्गत वेगवेगळया विभागांच्या कार्यक्षेत्रात, तसेच विभागनिहाय ज्येष्ठता यादीतील कर्मचाऱ्यांची बदली (Transfer)विभागांतर्गत वेगवेगळया उपविभागांच्या कार्यक्षेत्रात केली जाईल

(न) शासनाच्या वीज कंपन्या, केंद्र शासन राज्य शासनामध्ये काम करणाऱ्या पतीपत्नीचे नाते असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली (Transfer)रिक्त पदाच्या उपलब्धतेनुसार शक्यतो एकाच मुख्यालयात करावी

(प) वेतनगट तीन चार मधील स्त्री कर्मचारी शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या कर्मचाऱ्यांची बदली (Transfer)प्रशासनिक गरजा विचारात घेऊन सहानुभूतीपूर्वक करण्यात यावी त्यांना वरील कमाल कालावधी विचारात घेता त्यांचे क्षेत्रात कार्यरत राहण्यास शक्यतो अनुमती द्यावी

() महत्त्वाच्या कामगार संघटनांच्या राज्य सचिव अध्यक्ष या पदावरील कार्यरत असलेल्या कर्मचारी/अधिकारी यांना बदलीबाबत संरक्षण देण्यात यावे. मात्र हे संरक्षण त्यांचे संघटनेने जाहीर केलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी असलेल्या मुख्यालयाच्या बाबतीअसेल, सदर संरक्षण हे विशिष्ट पदाच्या बाबतीत असणार नाही

() ज्या कर्मचाऱ्यांचा मुलगा/मुलगी ज्या वर्षी १२ वीच्या परीक्षेस बसणार असेल त्या कर्मचाऱ्याची त्या वर्षी बदली (Transfer)करण्यात येऊ नये

() .रा.वि.वि.कं.मर्या. कर्मचारी सेवाविनियम २००५ शी संलग्नित पाचव्या अनुसूचीमध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार विहीत करण्यात आलेले अधिकारी हे बदली (Transfer)करण्यास सक्षम अधिकारी असतील

हेही वाचा.. 

महावितरण कर्मचारी बदली धोरण 2020 | Mahavitran Employees Transfer Policy 2020

बदलीचे वेळापत्रक 

सर्व नियंत्रण अधिकारी आणि बदली (Transfer)करण्यास सक्षम अधिकारी यांनी सर्वसाधारण बदलीकरिता खालील वेळापत्रक अंमलात आणावे

(i) सर्वसाधारण बदल्या वर्षातून फक्त एकदा एप्रिल मे महिन्यात करण्यात येतील.

(ii) विनंती बदलीकरिता ३१ मार्च पुर्वी आलेले अर्ज विनंती बदलीकरिता गठीत करण्यात आलेल्या समितीमार्फत विचारात घेण्यात यावेत.

(iii) विनंती बदलीचे अर्ज विचारात घेण्यासाठी समितीने एप्रिल मध्ये बैठक घ्यावी.

(iv) समितीच्या शिफारसी विचारात घेऊन त्या अनुषंगाने बदली (Transfer)आदेश १५ मे किंवा त्यापुर्वी पारित करण्यात यावेत.

(v) बदली (Transfer)झालेल्या कर्मचाऱ्यांना ३१ मे किंवा त्यापुर्वी बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या दृष्टीकोनातून स्थानिक पातळीवर योग्य ती व्यवस्था करुन तात्काळ कार्यमुक्त करण्यात यावे

बदलीयोग्य अधिकारी कर्मचारी यांना बदलीच्या मुख्यालयासाठी तीन पर्याय/पसंती देण्यासाठी विचारणा करण्यात यावी. त्यांनी त्यांचे पर्याय/पसंती ३१ मार्च पर्यंलेखी सादर करावी.

निगम कार्यालयाच्या सर्वसाधारण आदेशाच्या अधिन राहून परिच्छेदमध्ये नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार वित्तीय भार व प्रशासकीय अपरिहार्यता लक्षात घेऊन काटेकोरपणे विहित टक्केवारीनुसार/संख्येनुसार कर्मचाऱ्यांची बदली (Transfer) करावी

विनंती बदल्याबाबतची मार्गदर्शक तत्त्वे 

निगम/परिमंडळ/मंडळ आणि विभागीय कार्यालयात बदलीची विनंती करणारे विनंती अर्ज मोठया संख्येने प्राप्त होतात. त्यामध्ये लेखी विनंती अर्ज, प्रत्यक्ष भेट मुलाखत घेऊन विनंती करणारे, तसेच बाह्य माध्यमांमार्फत प्राप्त झालेले अर्ज व शिफारसी असतात.

एकूणच बदली (Transfer)प्रक्रियेत पारदर्शकता यावी, तसेच बाह्य माध्यमांच्या दबाव/हस्तक्षेपास प्रोत्साहन मिळू नये यासाठी कर्मचारी/अधिकारी यांच्या विनंतीनुसार बदली (Transfer)करताना खालील मार्गदर्शक तत्त्वे अनुसरण्यात यावीत

() सर्व कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीकरिता मानव संसाधन कार्यप्रणालीतून (HRMS) अर्ज सादर करावेत. प्रणाली व्यतिरीक्त लेखी स्वरुपातील विनंती अर्ज बदलीकरिता विचारात घेतले जाणार नाहीत.

(ख) अनावश्यक पत्रव्यवहार व अतिरिक्त प्रशासकीय कामकाज टाळण्याच्या दृष्टीकोनातून ज्या कर्मचाऱ्यांनी सध्याच्या पदावर/एका ठिकाणी किमान दोन वर्ष कार्यकाल पूर्ण केलेला आहे अशाच कर्मचाऱ्यांचे अर्ज पुढे पाठविण्यात येतील.

अत्यंत अनुकंपायुक्त/विशेष कारणास्तव केलेला अर्ज वगळता दोन वर्षाचा नियत कालावधी पूर्ण होण्याआधी केलेला कोणताही विनंती अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

(विनंती अर्ज सक्षम अधिकारी यांचेकडे ३१ मार्च पर्यंत पोहोचणे आवश्यक आहे

विनंती बदली (Transfer)करीता हे कारण ग्राह्य धरण्यात येतील.

(विनंती बदल्या फक्त खालील कारणासाठी विचारात घेतल्या जातील

जाहिरात

 1. कर्मचारी अथवा त्यांच्या कुटुंबातील भासद गंभीस्वरूपाचा वैद्यकीय उपचार करून घेत असतील अशा प्रकरणी विनंती बदली (Transfer)विचारात घ्यावी उदा.दीर्घकालीन कर्करोग, हृदयाची शस्त्रक्रिया, मज्जातंतु शल्यचिकित्सा, हाडाचा क्षय रोग, किडनी प्रतीरोपण किंवा अन्य प्रकारचे जुनाट गंभीर आजार. मात्र अशा प्रकरणी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने यथोचितरित्या शिफारस केलेले प्रमाणपत्र शल्यचिकित्सकाच्या प्रतिस्वाक्षरीसह सादर करणे अनिवार्य राहील.
 2. सर्वसाधारण बदलीच्या आदेशानंतर बदलीच्या ठिकाणी तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेले कर्मचारी विनंती बदलीसाठी पात्र ठरतील.
 3. कर्मचाऱ्याची अवलंबित मुले/पती किंवा पत्नी अपंग असेल व त्यांची वैद्यकीय सेवाशुश्रुषा अखंडितपणे करणे भाग असेल तेव्हा अशा ठिकाणी बदली (Transfer)करण्याचा विचार होईल. मात्र अशा प्रकरणी सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याने यथोचितरित्या शिफारस केलेले प्रमाणपत्र शल्यचिकित्सकाच्या प्रतिस्वाक्षरीसह सादर करणे अनिवार्य राहील.
 4. जे कर्मचारी घोषित करण्यात आलेल्या नक्षलग्रस्त भागातील परिमंडळ/मंडळ/विभाग किंवा कोकण परिमंडळामध्ये कार्यरत असतील अशा कर्मचा-यांच्या संदर्भात संबंधीत किमान कालावधी अनुक्रमे ३ वर्ष व २ वर्ष धरण्यात येत आहे. नक्षलग्रस्त क्षेत्रातील तसेच आदिवासी प्रकल्पांर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बदलीच्या ठिकाणी प्राधान्याने नियुक्ती देण्यात येईल.
 5. कर्मचाऱ्याची पत्नी किंवा पती ज्या ठिकाणी कार्यरत असेल त्या ठिकाणी बदली (Transfer)करावयाच्या प्रकरणी कर्मचाऱ्याची विद्यमान पदावर २ वर्षांची किमान सेवा पूर्ण झाली असेल अशी प्रकरणे विचारात घेतली जावीत.
 6. जो कर्मचारी पुढील दोन वर्षात सेवानिवृत्त होत आहे व ज्याने सद्याच्या पदावर ठिकाणी एक वर्ष कामकाज पूर्ण केले आहे अशा कर्मचाऱ्याचा विनंती अर्ज प्राधान्याने विचारात घेतला जाईल.
 7. ज्या अधिकाऱ्यांची पदस्थापना/बदली (Transfer)पदोन्नतीनंतर इतर परिमंडळात झाली आहे अशा पदस्थापनेच्या/बदलीच्या ठिकाणी दोन वर्षाची सेवा पूर्ण केल्यानंतर ते अधिकारी विनंती बदलीस पात्र ठरतील.
 8. सर्वसाधारण बदली (Transfer)धोरणाअंतर्गत परिच्छेद २ (क) नुसार कमाल कालमर्यादा म्हणून बदली (Transfer)करण्यात आलेले कर्मचारी जोपर्यंत बदलीच्या ठिकाणी किमान दोन वर्षाचा कालावधी पूर्ण करीत नाहीत तोपर्यंत विनंती बदली (Transfer)करीता पात्र ठरणार नाहीत.
 9. जे वेतनगट १ मधील अधिकारी सरळसेवा भरतीअंतर्गत नवीन नियुक्तीच्या ठिकाणी तीन वर्षाचा सेवाकाल पूर्ण करीत नाहीत अशा अधिकाऱ्यांचा विनंती अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
 10. ज्या कर्मचाऱ्यांची बदली (Transfer)करण्यात आलेली आहे आणि बदलीनंतर सेवानिवृत्तीसाठी २ वर्षे किंवा २ वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे अशा कर्मचाऱ्यांनी बदली (Transfer)झालेल्या ठिकाणी किमान १ वर्षाची सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे.
 11. सर्वसाधारण बदली (Transfer)धोरणाअंतर्गत बदली (Transfer)झालेल्या कर्मचाऱ्यांचे विनंती अर्ज गंभीर स्वरुपाचा आजार अत्यंत अनुकंपायुक्त कारणांव्यतिरिक्त ३ वर्षाची सेवा पूर्ण झाल्यावरच विचारात घेतले जातील.
 12. जे कर्मचारी बदली (Transfer)धोरणांतर्गत बदलीकरिता पात्र नाहीत अशा कर्मचाऱ्यांचे अर्ज वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवू नयेत, व अशा अर्जाची दखल घेण्यात येऊ नये.
 13. ज्या कर्मचाऱ्यांची बदली (Transfer)करण्यात आलेली आहे व त्यानंतर त्याच्या विनंतीनुसार एक वर्षाच्या आत अपवादात्मक बाब म्हणून पुन्हा बदली (Transfer)करण्यात आलेली आहे अशा कर्मचाऱ्यांनी बदली (Transfer)अनुदान कंपनीस परत करणे बंधनकारक राहील, व अशा नवीन बदलीसाठी बदली (Transfer)अनुदान देय राहणार नाही.
 14. विनिर्दिष्ट प्रकल्प अथवा योजना जसे RAPDRP, SCADA, ERP, HRMS इत्यादीसाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांना त्यांच्या विनंतीनुसार जेथे तो/ती ज्या विषयामध्ये तज्ञ अथवा प्रशिक्षित असलेल्या तंत्रशास्त्राला वाव आहे अशा ठिकाणी बदली (Transfer)करताना प्राधान्य देण्यात येईल. विशिष्ट अर्हता धारण करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱ्यांबाबत पदावधीमध्ये वाढ करण्याचा अधिकार प्रशासनास असेल.
 15. बदलीसाठी मुदतीत प्राप्त झालेले सर्व अर्ज संबंधित समिती समोर विचारार्थ सादर केले जातील आणि सक्षम अधिकाऱ्यांना शिफारस करताना समिती प्रकरणाच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करील. संबंधित सक्षम अधिकारी बदलीबाबत निर्णय घेताना रिक्त पदांची स्थिती विचारात घेतील.
 16. समितीच्या बैठकीपूर्वी प्रत्यक्ष भेटीसाठी न येण्याचा, तसेच बदलीसाठी बाह्य प्राधिकाऱ्यामार्फत संपर्क न साधण्याचा सल्ला कर्मचाऱ्यांना देण्यात येत आहे. 

विनंती बदली (Transfer)अर्जांची छाननी व शिफारस करणारी समिति 

शिफारस समिती (Recommending Committee) 

विनंती बदली (Transfer)अर्जाची छाननी शिफारस खालील अधिकाऱ्यांची समिती करील

(एक) निगम कार्यालय 

 1. संचालक (संबंधीत)
 2. कार्यकारी संचालक (मा.सं.)
 3. मुख्य महाव्यवस्थापक (मासं) आणि
 4. संबंधीत विभाग प्रमुख

(दोन) परिमंडळ कार्यालय 

 1. मुख्य अभियंता
 2. सहा. महाव्यवस्थापक (मासं)
 3. उप मुख्य औ.सं.अधिकारी
 4. कार्यकारी अभियंता (प्रशासन)

(तीन) मंडळ कार्यालय 

 1. अधीक्षक अभियंता
 2. कार्यकारी अभियंता (प्रशासन)
 3. व्यवस्थापक (मासं)/व्यवस्थापक (वि.ले.)
 4. अधीक्षक अभियंता यांनी नामनिर्देशित केलेला तांत्रिक कर्मचारी

(चार) विभागीय कार्यालय 

 1. कार्यकारी अभियंता
 2. अतिरिक्त कार्यकारी अभियंता/उप कार्यकारी अभियंता
 3. उप व्यवस्थापक (मासं)/प्रमुख लिपिक आणि उप व्यवस्थापक (वि.व ले.)
 4. कार्यकारी अभियंत्याने नामनिर्देशित केलेला वेतनगट ४ मधील तांत्रिक कर्मचारी

बदली (Transfer)करण्यास सक्षम अधिकारी (संबंधित समितीच्या शिफारशीनुसार) 

म.रा.वि.वि.कं.मर्या. कर्मचारी सेवाविनियम २००५ शी संलग्नित पाचव्या अनुसूचीमध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणांनुसार विहीत करण्यात आलेले अधिकारी बदली (Transfer)करण्यास सक्षम अधिकारी असतील.

ज्या सक्षम अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती पुढील महिन्यांच्या कालावधी दरम्यान आहे त्यांनी माहे एप्रिल / मे मध्ये सर्वसाधारण बदली (Transfer)रते वेळी गत वरिष्ठ अधिकायांच्या मंजुरीने बदलीची प्रकरणे हाताळावीत.

(एप्रिलमे वगळता अन्य कालावधी मध्ये बदल्या करावयाच्या असल्यास लगत वरिष्ठ प्राधिकारी यांची मान्यता अनिवार्य आहे.

महावितरण कंपनीच्या हितास्तव प्रशासकीय किंवा शिस्तभंगाच्या कारवाई प्रकरणी करावयाच्या बदल्या 

) एप्रिलमे महिन्याचा कालावधी वगळता अन्य वेळी गरज वाटेल/भासेल त्यावेळी प्रशासकीय स्वरूपाच्या बदल्या प्रशासकीय हितासाठी केल्या जातील. अशा अपवादात्मक कारणासाठी बदली (Transfer) करण्याकरिता बदली (Transfer)करण्यास सक्षम अधिकाऱ्याच्या लगत वरिष्ठ प्राधिकारी हे बदली (Transfer)करण्यास सक्षम अधिकारी असतील.

(ख) प्रशासकीय स्वरुपाच्या बदल्यांचे अधिकार सक्षम प्राधिकारी यांना खालील परिस्थितीत राहतील.

 1. आत्यंतिक वैद्यकीय कारणे.
 2. कार्यमुल्यमापन नेमकेपणे स्पष्ट करून.
 3. तक्रारींची तपासणी करून व त्या सकृतदर्शनी सिध्द झाल्यानंतर.
 4. अन्य सबळ कारणांची नोंद करून.

सर्वसाधारण बदल्यांचा कालावधी (एप्रिल/मे) वगळता इतर वेळी करावयाच्या बदल्या या लगत वरिष्ठ प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने खालील परिस्थितीत कोणत्याही वेळी करण्यात येतील.

 1. नवीन निर्माण झालेले पद.
 2. सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामा, पदावनत, पुनर्स्थापना बदलीमुळे निर्माण झालेले पद,रजेनंतर परत येणे त्यामुळे निर्माण झालेली जागा.
 3. सक्षम प्राधिकाऱ्याची अपवादात्मक बाब असल्याची बदली (Transfer)अत्यावश्यक असल्याची खात्री असल्यास.

घ) लाचलुचपतविरोधी खात्याच्या/गंभीर गैरवर्तणुकीच्या प्रकरणात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांची बदली (Transfer)त्यांच्या परिमंडळ/मंडळ/विभाग यांच्याबाहेर त्वरित केली जाईल व सदरचे पद हे ‘संवेदनशील पद’ म्हणून समजण्यात येईल. 

पदोन्नतीनंतर रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार इतर ठिकाणी बदली (Transfer)करण्यात येईल.

(छ) महावितरण कंपनीच्या हिताच्या दृष्टीकोनातून सक्षम अधिकारी, कर्मचाऱ्याच्या बदलीचा आदेश प्रशासकीय कारणासाठी कधीही देऊ शकतील, परंतु त्यांना अशा बदलीसाठी लगतच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्यांची मंजुरी घ्यावी लागेल

गंभीर स्वरुपाच्या गैरवर्तणुकीच्या तक्रारी असलेल्या प्रकरणी खात्रीअंती अशा अधिकारी/कर्मचारी यांना त्यांची सेवाजेष्ठता कोणत्याही क्षेत्रातील असली तरी विभागाबाहेर/मंडळाबाहेर/परिमंडळाबाहेर कोणत्याही क्षणी बदली करण्याचे अधिकार सक्षम अधिकाऱ्याच्या लगत वरिष्ठ प्राधिकाऱ्यास असतील.

८.

अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे 

बदलीविषयक धोरण म्हणून वर नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी १०.०८.२०१५ पासून करण्यात येईल

पूर्वीच्या .रा.वि.मंडळाने आणि आताच्या .रा.वि.वि.कं..ने बदलीसंदर्भात यापूर्वी जारी केलेले बदली धोरण अधिक्रमीत करण्यात येत आहे

) बदलीचा आदेश निर्गमित केलेल्या अधिकारी/ कर्मचाऱ्यांस एक आठवडयाच्या विहित कालावधीत कार्यमुक्त केले जावे. विहिमुदतीत त्यांना कार्यमुक्त केल्याकार्यमुक्त करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यास त्यासाठी जबाबदार धरले जाईल

या धोरणामध्ये बदल करण्याचे अधिकार सक्षम प्राधिकाऱ्यास असतील

बदली धोरणा संदर्भातील उपरोक्त मार्गदर्शक सूचनांची सक्त अंमलबजावणी करण्यात यावी

प्रतिक्रिया द्या

%d bloggers like this: