काम करताना घ्यावयाची खबरदारी. | Precautions To Be Taken While Working.
खरं म्हणजे वरीष्ठ अधिकार्यांनी विज कर्मचाऱ्यांशी सुरक्षिततेविषयी महत्त्वाचं बोलायला हव त्यांच्याशी संवाद वाढवायला हवा. अधिकारी म्हणून हे नक्की करा.
१} सुरक्षिततेची साधनं असल्याशिवाय कोणत्याही पोलवर चढुन देवू नका.
२} ग्राहक,शाखाधिकारी किंवा संघटना पदाधिकारी यांनी सुरक्षिततेची साधनं वापरल्याशिवाय आपले कर्मचारी पोलवर चढलेले आहेत असे आपल्याला समजल्यास त्याकडे दूर्लक्ष नको.कर्मचार्यांना लगेच जाब विचारा,त्यांच मत जाणुन घ्या,त्यांच्याशी संवाद साधा.
३} दरवर्षी कर्मचार्यांना सुरक्षित साधनांचा पुरवठा करा.
४} पोलवर चढण्यासाठी शिडीगाडी उपलब्ध करुन द्या कारण जास्त अपघात हे पाय घसरुन झालेले आहेत.
५} परिस्थिती निर्माण होणार्या कारणांचा शोध घेणे आवश्यक.
६} डिव्हिजन/सबडिव्हिजन पातळीवर आपत्कालीन परिस्थितीत काम करण्यासाठी कर्मचार्यांची नियुक्ती करावी.
७} अपघातजन्य परीस्थिती निर्माण होण्याच्या मुळ कारणांपर्यंत तपास करुन योग्य ती उपाययोजना व्हावी म्हणजे अशी धोकादायक स्थिती पुन्हा निर्माण होणार नाही. सुरक्षा जागृति करण्यासाठी प्रयत्न करावेत.
८} होता होता वाचलेल्या अपघातांची कारणमिमांसा तपासणे व सर्व पातळीवर निदर्शनास आणने.
विज कर्मचार्यांनो……..
१} भरपूर नाश्ता जेवण केल्याशिवाय पोलवर चढु नका.
२}कोणतही काम हे आपल्या जिवापेक्षा महत्ताचं नाही हे लक्षात घ्या.
३} एकाच पोलवर दोन पेक्षा जास्त कर्मचारी नको.
४} विजेवर आणि स्वतः च्या ताकदी बद्दल “फाजील आत्मविश्वास ” नको.
५} अगदी गूंतागुंतुच्या ठिकाणी{शहरी भागात} पोलच्या अगदी वरती टोकावर जाण्याची खरंच गरज आहे का हा प्रश्न स्वतः ला विचारूनच पोलवरती चढा.
६} पोलवर चढल्यानंतर मोबाईल फोनचा वापर टाळा.
७} पोलवर चढण्यापुर्वी विज पुरवठा बंद झाल्याची खात्री करा,अर्थिंग करुनच कामास सुररवात करा.
८} काम करत असताना आपल्या सहकार्यांसोबत चेष्टा मस्करी,स्टंट करु नका.
९} काम करत असताना धुम्रपान करु नये.
१०} डि.पी वर फ्युज टाकताना कींवा काढताना हॅन्डग्लोव्हजचा वापर करावा.
११} आपले काम झाल्यावर टाईमपास नको. वेळेत घरी निघा….घरी कोणीतरी वाट पाहतं असतय याच भान ठेवा.
१२} दररोज पाच मिनिटे आपल्या कर्मचार्यांशी सुरक्षिततेविषयी चर्चा करावी. विज कामगारांनो आपले आयुष्य हे लहान आणि अनमोल आहे त्याला अधिक लहान बनवु नका.
प्रत्येक विज कर्मचार्यांनी ही माहिती वाचावी व ईतरांना वाचुन दाखवावी तांत्रिक कर्मचाऱ्यांना माहितीस्तव सादर….