सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) बद्दल सविस्तर माहिती. | Detailed information about Service Book.

 

अनुक्रमणिका

Advertisement
Advertisement
Advertisement
 
Advertisement

सेवा पुस्तिके बद्दल सविस्तर माहिती. | Detailed information about Service Book.

1.सर्वसाधरण माहिती

1.1 महत्ताचे (Service Book)

 1. महाराष्ट्र नागरी सेवा (सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम – 1981 मधील नियम 36 परिशिष्ट -4 नूसार सेवापुस्तकाचा (Service Book) नमुना विहित करण्यात आला आहे.
 2.  मुंबई वित्तिय नियम, 1959 नियम-52 परिशिष्ठ-17 अन्वये सैवा पुस्तक हे अभिलेख जतनाच्या अ वर्गात मोडते याचाच अर्थ ते प्रदिर्घ कालावधीपर्यंत जतन करुन ठेवणे आवश्यक असल्याने ते सुस्थितीत ठेवण्याची सुरवातीपासूनच दक्षता घेणे आवश्यक आहे
 3. सेवा पुस्तक हे त्या कर्मचार्याचा सेवेचा अत्यंत महत्वाचा अभिलेख आहे. सेवापुस्तक अपूर्ण असेल/ नसेल/काही आक्षेप असतील तर कर्मचार्यास/अधिकाप्यास निवृत्ती नंतरचे देय लाभ मिळण्यास अडचणी येतात..
 4. स्वतचे मूळ व दुय्यम सेवापुस्तक प्रत्येकी 6 ते 7 पुस्तकांचे एकत्रीत बायडींग करुन तयार करुन घ्यावे व त्याला पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत पृष्ठ क्रमांक देण्यात यावेत
  Advertisement
 5. प्रत्येकाने आपले मूळ/दुय्यम सेवा पुस्तक अद्यावत । सुस्थितीत आहे व त्यात सर्व आवश्यक नोंदी घेतल्या असल्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.
 6. अधिकारी/ कर्मचारी यांची बदली झाल्यानंतर त्याचे मुळ सेवापुस्तक त्यांच्या ताब्यात देऊ नये. सदरचे सेवापुस्तक एका कार्यालयाकडून दुसर्या कार्यालयाकडे विहित मार्गानेच पाठवावे. (सार्वजनिक बांधकाम विभाग परिपत्रक दि.30/01/2019)
 7. निवृत्तीवेतनाची प्रकरणे महालेखापाल कार्यालयाकडे पाठवितानाच्या अर्जात निवृत्त कर्मचान्याचे नाव सेवापुस्तकातील पहिल्या पानावरील नोंदी प्रमाणेच असण्याची दक्षता घेण्यात यावी (वित्त विभाग परिपत्रक दि.10/01/2014)

1.2 सेवा सेवापुस्तकाचे उपविभाग (Subdivision of Service Book)

सेवापुस्तक हे प्रामुख्याने 5 उपविभागात विभागले आहे.

 1. पहिले पान
 2. नियुक्ती तपशिल
 3. रजेचा हिशोब
 4. अर्हताकारी सेवेशी प्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या घटनांचा तपशिल
 5. सेवा पड़ताळणी

2.सेवा पुस्तकातील महत्वाच्या नोंदी

(Important entries in the service book)

2.1 सेवा पुस्तिकेच्या पहिल्या पानावरील नोंदी- (Entries on the front page of the service book)

 1. जन्म तारीखेची नोंद- जन्म तारीखेची नोंद घेताना तीची कशाच्या आधारे पड़ताळणी केली त्याचा उल्लेख करावा. जन्म तारीख अंकी व अक्षरी लिहून कार्यालय प्रमुखाने स्वाक्षरी करावी.
 2. धर्म व जात लिहीताना आपली मुळ जात लिहावी. तसेच आपण ज्या प्रवर्गातुन सेवेस लागलो त्याचाही कंसात उल्लेख करावा.
 3. सेवेत प्रवेश करताना असलेल्या शैक्षणिक अर्हतेची नोंद सेवापुस्तकात घेऊन त्यात वाढ झाल्यास त्या प्रमाणपत्राच्या उल्लेखासह ती नोंद साक्षांकित करावी.
 4. वडिलांचे नाव व मुळ राहण्याचे ठिकाण
 5. वैद्यकीय प्रमाणपत्राची नोंद

2.2 प्रथम नियुक्तीनंतरच्या नोंदी- (Entries after first appointment)

 1. 6. प्रथम नियुक्ती आदेश
 2. 7. प्रथम रुजु दिनांक
 3. 8. प्रथम नियुक्ती स्थायी/अस्थायी बाबतची नोंद व नियुक्तीचा प्रवर्ग
 4. 9. ज्या पदावर नियुक्ती ते पदनाम व वेतन श्रेणी
 5. 10. स्वग्राम घोषणापत्राची नोंद
 6. 11. गट विमा योजना सदस्य नोंद व कपात केलेली रक्कम
 7. 12. अपघात विमा योजना सदस्य नोंद व विमा कपात रक्कम
 8. 13. मराठी भाषा परिक्षा उत्तीर्ण/सुट आदेश नोंद
 9. 14. हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण/सुट आदेश नोद
 10. 15. संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण झाल्याची/ सुट नोंद
 11. 16. चारित्र्य पड़ताळणी नोंद (विभाग प्रमुखाच्या सहमतीने)
 12. 17. स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद
 13. 18. जात पड़ताळणी बाबतची नोंद
 14. 19. टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण झाल्याची नोंद
 15. 20. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद
 16. 21. DCPS / NPS खाते क्रमांक नोंद
 17. 22. विभागीय परिक्षा उत्तीर्ण अथवा सुटीची नोंद
 18. 23. परिविक्षाधीन कालावधी समाप्त करुन नियुक्ती नियमित केलेल्या आदेशाची नोंद
 19. 24. छोटे कुटुंब प्रमाणपत्र
 20. 25. अपगासाठी राखीव पदावर नियुक्ती झाल्यास अपगत्वाबाबतची विहित वैधता प्रमाणपत्र
 21. 26. निष्ठेचे शपथपत्र कर्मचा-याकडून घेऊन ते साक्षांकित करुन सेवाभिलेख्यात / सेवापुस्तकात चिकटावे-(शासन परिपत्रक सा.प्र विभाग दि. 11.9.2014 व दि. 6. 10.2015)

2.3 नियमित बाबी/ घटना (Regular Matters / Events)

 1. 27. वार्षिक वेतनवाढ
 2. 28. वार्षिक वेतनवाढ मंजूरीनंतर रकाना क्रमांक 8 मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी घ्यावी.
 3. 29. बदली झाली असल्यास बदली आदेश, कार्यमुक्तीचा आदेश, नवीन पदावर रुजु झाल्याचा दिनांक, इत्यादी तपशिलाची नोंद जेथे पदग्रहण अवधी अनुजेय असेल तेथे पदग्रहण अवधीची नोंद
 4. 30. पदोन्नती /पदावन्नतीच्या आदेशाची नोंद
 5. 31. पदोन्नती /पदावन्नतीच्या पदावर रुजू दिनांकाची नोंद
 6. 32. पदोन्नती /पदावन्नतीच्या पदाच्या वर्गाच्या वेतनश्रेणीची व वेतन निश्चितीच्या आदेशाची नोद
 7. 33. वेतन निश्चितीसाठी विकल्प दिला असल्यास त्याची नोंद
 8. 34. पदोन्नती /वेतन आयोग/ कालबध्द पदोन्नतीमुळे / एकस्तर पदस्थापनेमुळे वेतन निश्चिती केल्याची नोंद
 9. 35. ज्या वेळेस वेतन श्रेणीत बदल झाला असेल त्यावेळेसची वेतन आयोगानुसार वेतन पडताळणी पथकाकडुन करण्यात आलेल्या प्रमाणपत्राची नोंद
 10. 36. मनासे (वे सु) नियम 1978 नुसार वेतन पड़ताळणी पथकाकड़ून वेतननिश्चिती पडताळणी झालेली नसल्यास शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक 20-08-1986 नुसार कार्यालय प्रमुखाने नोंदविलेल्या प्रमाणपत्रकाची नोंद
 11. 37. ज्या वेतन श्रेणीत दक्षता रोध येत असेल तो दक्षता रोध पार करण्यास मंजूरी दिलेल्या आदेशाची नोंद
 12. 38. एखाद्या पदावरील नियुक्ती तदर्थ/तात्पुरची स्वरूपाची असल्यास त्या आदेशाची नोंद व ती नियुक्ती नियमित केली असल्यास त्याची नोंद
 13. 39. अनिवार्य प्रशिक्षण/सेवार्गत प्रशिक्षणाची नोंद/ पायाभूत प्रशिक्षण/विदेश प्रशिक्षणासाठी पाठविले असल्यास त्याची नोंद
 14. 40. ज्या पदावर काम करित असेल ते पद कोणत्या प्रवर्गातील/ गटातील आहे त्याची नोंद
 15. 41. वार्षिक सेवा पडताळणी नोंद
 16. 42. गट विमा योजना वर्गणीत बदल झाल्यास त्याची दिनांक निहाय व थकीत रकमेसह वसुलीची नोद
 17. 43. वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमा रोखीने CPF मध्ये जमा तपशिल प्रमाणक क्रमांक व दिनांक (प्रत्येक हप्त्यानुसार)

2.4 विशिष्ठ बाबी/ घटना- (Specific Matters / Events)

 1. 44. सेवेतुन कमी केली असल्यास त्या आदेशाची नोंद
 2. 45. पुर्ननियुक्ती केली असल्यास त्या आदेशाची नोंद
 3. 46. दोन नियुक्तीमध्ये, खंड असल्यास खंडाची नोंद
 4. 47. दोन नियुक्त्यांमधील खंड क्षमापित केला असल्यास त्याची नोंद
 5. 48. सेवा कालावधीतील निलंबन, निलंबन कालावधी नियमित केला असल्यास त्याची नोंद
 6. 49. सेवेतील झालेली शिक्षा
 7. 50. संपात सहभाग घेणे
 8. 51. राजीनामा देणे/परत घेणे
 9. 52. अनाधिकृत गैरहजेरी
 10. 53. पुरस्कार/गौरव/तदनुषंगिक अनुजेय लाभाच्या नोंदी
 11. 54. आगाऊ वेतनवाढी मंजुर केलेल्या आदेशाची नोंद व त्यानुसार केलेली वेतननिश्चीती किंवा मजुर केल्याची नोंद
 12. 55. सक्तीचा प्रतिक्षाधीन कालावधी नियमित केला असल्यास त्याची नोंद
 13. 56.वेतन समानीकरणाची नोंद
 14. 57. मानीव दिनांक देण्यात आला असल्यास त्याची नोंद
 15. 58. नावात बदल झाला असल्यास सप्रमाण नोद
 16. 59. जनगणना रजेची नोंद
 17. 60. सुट्टीच्या कालावधीतील प्रशिक्षण नोंद

2.5 स्वियेत्तर सेवेतील नोंदी- (Self-service records)

 1. 61. स्वियेत्तर सेवेतील नियुक्ती आदेशाची नोंद कलावधीसह
 2. 62. स्वियेत्तर सेवेतुन मूळ विभागात प्रत्यावरतन आदेशाची नोंद
 3. 63. स्वियेत्तर सेवेत रजावेतन/निवृत्तीवेतन अंशदानाच्या भरणा केलेल्या रकमा
 4. 64. स्वियेत्तर सेवेतील महालेखापाल कार्यालयाकडून प्राप्त No Dues प्रमाणपत्राची नोंद
 5. 65. प्रतिनियुक्ती कालावधीतील गट विमा योजना, रजा लेखा नोंदी .

2.6 रजा व तत्सम नोंदी (Leave and similar records)

 1. 66. शासन निर्णय वित्त विभाग दि. 09 11-32 नूसार आगाऊ जमा करावयाच्या रजा नोंदी
 2. 67. कर्मचा-याने वेळोवेळी उपभोगलेल्या व मंजूर केलेल्या रजा नोंदी रजा मंजुर आदेश रजा लेखा नोंदीसह
 3. 68. स्वग्राम/महाराष्ट्र दर्शन रजा सवलत घेतल्याची नोंद
 4. 69. बालसंगोपन रजेचा स्वतंत्र रजा लेखा ठेवणे आवश्यक आहे( शा.नि. वि.वि. दि.23.7.2018 व 15.12.2018 )

2.7 विविध नामनिर्देशन (Miscellaneous nominations)

 1. 70. गट विमा योजना नामनिर्देशन
 2. 71. भविष्य निर्वाह निधी नामनिर्देशन
 3. 72. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद
 4. 73. मृत्य नि सेवा उपदानाची नामनिर्देशनाची नोंद
 5. 74. DCPS/NPS नामनिर्देशनाची नोंद
 6. 75. अपघात विमा योजना नामनिर्देशनाची नोंद
 7. 76. कुटब प्रमाणपत्र

2.8 विविध अग्रीमे नोंदी- (Miscellaneous advance entries)

 1. 77. शासकीय कर्मचारी /अधिकारी याना मंजूर करण्यात येणार्या अग्रिमाच्या नोंदी-(शासन निर्णय वित्त विभाग दि.5.9.2000 )

      अ ) १) अग्रिमाचा मंजरी आदेश क्रमांक व दिनांक

            २) ह्यात अपत्यांची संख्या

       ब)मंजुर अग्रिमाची एकूण रक्कम रुपये व प्रदान करावयाच्या हप्त्यांची सख्या

       क)१) प्रदान करावयाचा हप्ता क्रमांक

           २) हप्त्याची रक्कम रुपये

           ३)प्रमाणक क्रमांक व दिनांक रुपये

      ड) परतफेडीच्या

           १) हप्त्यांची सख्या

           २) दरमहाच्या समान हप्त्याची रक्कम रूपये

           ३) परतफेड ज्या महिन्याच्या वेतनातून सुरु होणार आहे तो महिना

      ई)मदतपूर्व जादा परतफेडीच्या रकमेची नोंद

            १) रक्कम रूपये

            २) चलन क्रमांक दिनांक

    2. 78. सहकार विभागाकडून लेखाशीर्ष 6216-गृहनिर्माणसाठी कर्ज मंजूर झालेल्या व     वितरीत केलेल्या घर बांधणी कर्जाच्या प्रत्येक हप्प्त्याची नोंद ( शा.परिपत्रक सहकार,पणन व वस्त्रे उदयोग विभाग दि 25.8.2011)

      

     3. 79. घरबांधणी अग्रीम व व्याज वसुल झाल्यानंतर प्राप्त No Mues प्रमाणपत्राची नोंद

     4. 80. घरबांधणी अग्रीम वरील Accured Intrest- चा फायदा घेतला असल्यास त्याची नोंद- (शासन निर्णय वित्त विभाग दि.3.7.2002 )

2.9 सेवा निवृतीनंतरच्या नोंदी- (Retirement entries in the service book)

 1. 81. सेवा निवृत्त / शासकीय सेवेतून कार्यमुक्त केल्याची नोंद
 2. 82. महालेखापाल कार्यालयाकडुन मंजुर अंतिम सेवानिवृत्ती वेतन, bClR६, निवृत्ती वेतनाचे अशराशीकरणाची नोंद
 3. 83. रजा रोखीकरण, रक्कम व प्रमाणक क्रमांक व दिनांकाची नोंद
 4. 84. GPF अंतिम प्रदान रक्कम, प्रमाणक क्रमांक व दिनांक AG च्या मंजूरी आदेशासह नोंद
 5. 85. सेवानिवृत्तीनंतर गट विमा योजनेचे प्रदान केल्याची रक्कम, प्रमाणक क्रमांक व दिनांकासह नोद

2.10 सेवापस्तकाची वार्षिक पड़ताळणीः- (Annual Verification of Service Book:)

 1. 86. म. ना. से.(सेवेच्या सर्वसाधारण शर्ती) नियम 1981 मधील नियम 45 नुसार सेवापुस्तकाची वार्षिक पडताळणी करणे आवश्यक आहे व प्रत्येक वर्षाच्या मे महिन्यामध्ये कार्यालय प्रमुखाने वार्षिक पड़ताळणी करावी.
 2. कार्यालय प्रमुखाने वेतन देयके, वेतनपट आणि नमुद करण्यात येतील असे तत्सम अभिलेखे यावरून सेवेची पड़ताळणी मारगील वित्तीय वर्षाच्या अखेरपर्यंत केल्याचे प्रमाणपत्राची नोंद ..

2.11 इतर माहत्त्वाच्या सचना- (Other important suggestions)

 1.  88. कर्मचार्यांच्या बदलीनंतर कर्मचा-यास दुट्यम सेवापुस्तक अद्यावत करुन दिले असल्याची नोंद मुळ सेवापुस्तकात घेऊन त्यावर कर्मचा-याची स्वाक्षरी घ्यावी
 2. 89. स्त्री कर्मचारीने वैद्यकीय खर्च प्रतिपुर्तीसाठी आईवडील ऐवजी सासुसासरे यांची निवड केली असल्यास त्याची नोंद
 3. 90. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे.
 4. 91. दरवर्षी माहे सप्टेंबरमध्ये अखेर वित्तिय वर्ष निहाय मूळ सेवा पुस्तकातील नोंदी दुय्यम सेवापुस्तकात घेऊन व तसे प्रमाणपत्र मुळ सेवापुस्तकात नोंदवुन व त्यावर सक्षम अधिकार्याची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे व दुय्यमसेवा पुस्तकाची प्रत कर्मचा-यास देऊन त्याची स्वाक्षरी घेण्यात यावी.
 5. 92. कर्मचारी याचा सेवार्थ ID, PRAN No, आधार नबर, PAN नंबर, DDO Code एका वेगळ्या कागदावर लिहून तो कागद सेवापुस्तकात चिकटावा.
 6. 93. कार्यालयात/कार्यालयातुन रुजू/कार्यमुक्ताच्या नोंदी घेताना मध्यान पूर्व/मध्याननंतर जरूर लिहावे
 7. 94. निवृत्ती वेतनासाठी अर्हताकारी नसणारा कालावधी लाल शाईने दर्शविणे आवश्यक आहे
 8. 95. ज्या ज्या वेळेस नामनिर्देशन (Nomination) अद्यावत केली जातात त्या त्या वेळेस तशी नोंद सेवा पुस्तकात घेणे आवश्यक आहे.
 9. 96. शासन निर्णय वित्त विभाग दि. 01/09/2005 अन्वये सेवापुस्तकात वेतनविषयक बाबींची नोंद घेत असताना त्यामध्ये महागाई वेतनाची नोंद स्वतंत्रपणे घेण्यात यावी.
 10. 97. राजपत्रित अधिकारांच्या बाबतीत दि.30/11/1989 पर्यंतच्या सेवेचे अभिलेखे महालेखापाल यांनी ठेवलेल्या नमुना न.25 रजा लेखा हिशोबासह ठेवलेले प्राप्त करून घेवून त्यातील नोंदी सेवा पुस्तकात घेणे आवश्यक आहे.
 11. 98. फक्त सेवा पुस्तक हेच नेहमी कर्मचारी यांची बदलीनंतर एका कार्यालयाकडून दुसऱ्या कार्यालयाकडे पाठविण्यात येणारा दस्ताऐवज असल्यामुळे आपल्या सेवेसंबधीत सर्व प्रकारच्या नोंदी त्यात घेणे अत्यंत आवश्यक आहे.कारण वैयक्तिक नस्ती या काही एका कार्यालयाकडून दुसर्या कार्यालयात पाठविल्या जात नाहीत.

3.सेवापुस्तकांना चिकटवायचे महत्वाचे दस्तावेज

(Important documents to stick to service books)

शक्यतो सर्व महत्त्वाचे आदेश / प्रमाणपत्र सेवापुस्तकात लावावे म्हणजे ते तात्काळ उपलब्ध होतात,जसे

 1. वैद्यकीय प्रमाणपत्र
 2. जात वैधता प्रमाणपत्र
 3. खालील प्रमाणेची विविध नामनिर्देशन —

        i . GIS

        ii. GPF

        ii. Pension

       iv. DCRG

       v. NPS

      vi. DCPS

      vii. कुटुंब प्रमाणपत्र

      vii. अपघात विमा

4.वेतन निश्चिती (वेतन आयोग/ पदोन्नती / इतर)

5.विकल्प (option) Form

6.ज्यादा रक्कम अदायगी वसूलीचे हमीपत्र

    7.वेतन आयोग फरकाच्या हप्तेचा तपशिल, तसेच प्रदान रकमेचा प्रमाणक क्रमांक व दिनाकासह

৪. चारित्र्य प्रमाणपत्र

   9. MSCIT /तत्सम प्रमाणपत्र

   10. नाव बदललेले असले तर त्याबाबतचे राजपत्र

   11.स्वग्राम घोषित आदेश

   12.GIS बद्दल आदेश

 1. स्थायित्व प्रमाणपत्र आदेश

   14.परिविधाधीन कालावधी पूर्ण केल्याचा आदेश

   15.मराठी/ हिंदी परिक्षा पास / सुट आदेश

   16.विभागीय परीक्षा उत्तीर्ण / सुट आदेश

   17.शा.परिपत्रक वित्त विभाग दि.20.1.2001 नूसारचे विवरणपत्र

4.सेवापुस्तकातील महत्त्वाचे आक्षेप

(Important Objections In The Service Book)

 1. सेवापुस्तकातील service book रजा लेखा अपूर्ण असणे.
 2. सेवापुस्तकातील रजा लेखा चुकीचा असणे.
 3. सेवापुस्तकात मराठी/हिंदी भाषा परिक्षा सुट आदेश नोंद नसणे.
 4. वेतननिश्चितीसाठी विकल्प न घेणे.
 5. वेतन आयोगाची वेतननिश्चिती मधील आक्षेप.
 6. चारित्रय पडताळणी झाल्याची नोंद नसणे.
 7. स्थायित्व प्रमाणपत्राची नोंद नसणे.
 8.  शासन निर्णय वित्त विभाग दि.05.05.2010 नुसार आवश्यकत्या प्रकरणात वेतननिश्चिती सुधारीत न केल्यामुळे येणारी वसुली व सदर वसुलीची नोंद सेवापुस्तकात न घेणे.
 9. स्वग्राम घोषित केल्याची नोंदी नसणे.
 10. गटविमा योजना वर्गणी कपात रक्कमांची नोंद नसणे
 11. टंकलेखन परिक्षा उत्तीर्ण नोंद नसणे
 12. कार्यालय प्रमुखाने दर 5 वर्षांनी पहिल्या पानावरील नोंदी प्रमाणित न करणे.
 13. सेवा पड़ताळणी नोद नसणे.
 14. शा.नि. वित्त विभाग दि. 1.9.2015 नूसार सुधारित वेतन संरचनेमध्ये वार्षिक वेतनवाढ मंजूर करताना कर्मचारी यांचे वेतन कमाल टप्पाचे पुढे जात असेल तर अशा प्रकरणी ते वेतन त्या कमाल टप्पावर सिमीत न करणे
 15. सेवाप्रवेशोत्तर परिक्षा विहित संधीत उत्तीर्ण न होता वेतनवाढी प्रदानाबाबत
 16. संगणक अर्हता परीक्षा विहित दिनांकास उत्तीर्ण न झाल्याने वेतनवाढींचे अतिप्रदान
 17. पदोन्नतीची वेतननिश्चीती चुकीच्या वेतनावर करणे
 18. सुधारीत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ चुकीच्या वेतनावर अदा करणे
 19. एकाकी पदास ग्रेड वेतन चुकीचा अदा केल्याने अतिप्रदान
 20. एकस्तर पदोन्नती क्षेत्रासाठी एकस्तर पदोन्नती योजनेची वेतननिश्चीती चुकीच्या वेतनावर करणे
 21. एकस्तर पदोन्नती योजनेची वेतननिश्चीती जोडपत्र-3 नुसार केल्याने अतिप्रदान
 22. एकस्तर पदोन्नती योजनेची वेतननिश्चीती एकस्तर वरुन एकस्तर योजनेत केल्याने अतिप्रदान
 23. आश्वासित प्रगती योजना मंजूर असतांना एकस्तर पदोन्नती योजनेअंतर्गत वेतन अदा केल्याने अतिप्रदान
 24. रजा लेखा चुकीचा लिहिल्याने रजा रोखीकरणाचे अतिप्रदान
 25. विहित नामनिर्देशन / प्रमाणपत्र व नोंदी न घेणेबाबत
 26. पदोन्नती / आश्वासति प्रगती योजनेचा विकल्प मंजुर नसतांना तो विचरत घेवून वेतननिश्चीती केल्यामुळे अतिप्रदान

संकलन

डॉ. भानुदास सि. जटार

सहाय्यक संचालक

स्थानिक निधि लेखा परीक्षा


(टिप:- सदर माहिती हि फक्त प्रशिक्षणाकरिताच असून तिचा प्रमाण म्हणून कुठेही उपयोग करता येणार नाही.)

Advertisement
whatsapp-group-artechgallery.in
Advertisement
आम्हाला खात्री आहे की हा लेख आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. AR Tech Gallery मध्ये आम्ही महावितरणशी संबंधित नवीन जुने परिपत्रक (Circulars) ह्याबद्दल माहिती, नवीन Updats MD India Medicine Policy बद्दल माहिती नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती,इत्यादी माहिती पोस्ट करत असतो. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला त्यासाठी आपण खाली "प्रतिक्रिया द्या" ह्या मध्ये सांगू शकता. आणि आपल्याला विनंती आहे की आमचा Facebook ग्रुप मध्ये सहभागी व्हा. खलील लिंक वर क्लिक केल्यास आपण AR Tech च्या Facebook Group मध्ये जॉईन होण्यासाठी Request करुस शकता. https://www.facebook.com/groups/artechgallery.in/?ref=share
Advertisement
Advertisement
आम्हाला खात्री आहे की हा लेख आपल्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. AR Tech Gallery मध्ये आम्ही महावितरणशी संबंधित नवीन जुने परिपत्रक (Circulars) ह्याबद्दल माहिती, नवीन Updats MD India Medicine Policy बद्दल माहिती नवीन तंत्रज्ञानाबद्दल माहिती,इत्यादी माहिती पोस्ट करत असतो. आमचा हा उपक्रम आपल्याला कसा वाटला त्यासाठी आपण खाली "प्रतिक्रिया द्या" ह्या मध्ये सांगू शकता. आणि आपल्याला विनंती आहे की आमचा Facebook ग्रुप मध्ये सहभागी व्हा. खलील लिंक वर क्लिक केल्यास आपण AR Tech च्या Facebook Group मध्ये जॉईन होण्यासाठी Request करुस शकता. https://www.facebook.com/groups/artechgallery.in/?ref=share
whatsapp-group-artechgallery.in

1 thought on “सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) बद्दल सविस्तर माहिती. | Detailed information about Service Book.”

प्रतिक्रिया द्या

error

Share करा

%d bloggers like this: